Top News

विदर्भ इस्टेट ब्रम्हपुरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन #chandrapur #Brahmapuri




(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी:- विदर्भ इस्टेट ३ ब्रम्हपुरी येथे ७५ वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम करून सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ मेंटेनन्स सोसायटी संचालक मंडळ यांचे वतीने करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मालार्पण करण्यात आली. व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.


यामध्ये भाषण स्पर्धा, गितगायन स्पर्धा, एकल डान्स स्पर्धा, समूह डान्स स्पर्धा घेण्यात आली व विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांकाचे व सहभागी झालेल्या सर्व स्पर्धाकांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विदर्भ मेंटेनन्स सोसायटीचे अध्यक्ष मा.घनश्याम कुळमेथे सर,उपाध्यक्ष मनोहर राठोड सर,वि.में.सोसायटीचे कोशाध्यक्ष, पुण्यवता रामटेके, मॅडम सचिव मा.विनोद जुमनाके सर,संचालक जग्गनाथ कोरे सर,संचालक प्रविण बन्सोड सर, संचालिका सौ.मुन्नी शेंडे मॅडम व विदर्भ इस्टेट-३ येथील बंधू-भगिनी व बालगोपाल मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा मनोहर राठोड सर यांनी केले तर अध्यक्षीय मनोगतातुन मा. कुळमेथे सर यांनी विदर्भ इस्टेट येथील बंधू-भगिनी यांना उपकृत केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मा. पुण्यवता रामटेके यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने