Top News

बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न #chandrapur #Brahmapuri

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी विधानसभा स्तरावरील बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर ब्रम्हपुरी येथे २८ जानेवारीला संपन्न झाला. या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे अध्यक्ष बहुजन समाज पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष इंजि.शिरीषकुमार गोगुलवार हे होते.

या शिबिराकरिता प्रमुख मार्गदर्शक योगेश लांजेवार नगरसेवक नागपूर आणि प्रा.नितेश कांबळे नागपूर हे होते. मंचावर जिल्हा प्रभारी मूकद्दर मेश्राम जिल्हा कोषाध्यक्ष मनोहर बांबोळे,ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष विजय जनबंधु आदी उपस्थित होते.

बहुजन समाज पक्ष या देशातील तिसरी मोठी राजकीय शक्ति आहे.मानवतावादी विचार आणि भारतीय संविधानाची अंमलबजावणी हा प्रमुख मुद्दा घेऊन समस्त सर्वजण हिताय सर्वजण सुखाय अशी समतामुलक समाज निर्मिती करणे हा बसपाचा मुख्य अजेंडा आहे.

पक्षाच्या सुरवातीपासून ते आतापर्यंत झालेली वाटचाल यावर प्रकाश टाकण्यात आला.बहुजन समाज पार्टी च्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावतीजी यांच्या नेतृत्वात देशभरातील प्रत्येक राज्यात हत्तीची छाप पडत असून कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे.त्यासाठी आणखी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आपले संघटन मोठ्या प्रमाणात उभे करावे असे मार्गदर्शन उपरोक्त मार्गदर्शकांनी केले.

सावली,सिंदेवाही आणि ब्रम्हपुरी येथून कार्यकर्ते आणि समर्थक या शिबिराला हजर होते. शिबिराचे संचालन बसपा ब्रम्हपुरी विधानसभेचे प्रभारी नंदू खोब्रागडे यांनी केले तर अतिथींचे आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार बसपा ब्रम्हपुरी विधानसभेचे दुसरे प्रभारी खेमचंद नंदेश्वर यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने