Bigg Boss 17 Winner: मुनव्वर फारुकी ठरला 'बिग बॉस-17' चा विजेता

Bhairav Diwase
0

छोट्या पडद्यावरील बिग बॉस-17(Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा मुनव्वर फारुकी Munawar Faruqui) हा विजेता ठरला आहे. मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui), अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि मन्नार चोप्रा (mannara chopra) हे बिग बॉस-17 या कार्यक्रमाचे टॉप-3 स्पर्धक ठरले.


यापैकी मुनव्वर फारुकीनं बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सलमान खाननं (Salman Khan) मुनव्वर फारुकीला बिग बॉस-17 या कार्यक्रमाची ट्रॉफी दिली. मुनव्वरला 50 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तसेच त्याला एक कार देखील मिळाली आहे.



बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला. मुनव्वर हा बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा महाविजेता ठरला आहे. मुनव्वरचा वाढदिवस आहे. मुनव्वरसाठी त्याचा हा वाढदिवस खास ठरला आहे, कारण त्याला बिग बॉस-17 ची ट्रॉफी मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)