Top News

गणपूरवरून गंगापूरला जाणारा डोंगा नदीत उलटला #chandrapur #gadchiroli #Chamorshi #pombhurna

पोंभुर्णा:- चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील पोंभूर्णा ( pombhurna) तालुक्यातील गंगापूर टोक (Gangapur tok) येथे मिरची तोडणीसाठी वैनगंगा नदीच्या (Vainganga River) पात्रातून दोन डोंग्याने (Donga) या महिला निघाल्या होत्या. नदीपात्राच्या मधोमध आल्यानंतर डोंगा अचानक उलटला. डोंग्यात बसलेल्या महिला नदीपात्रात बुडाल्या. मंगळवारी (tuesday) सकाळी ही घटना घडली. घटना उघडकीस येण्यासाठी बराच वेळ लागला. तोवर दोन महिलांचा मृत्यू (2 Death of a woman) झाला होता.

डोंगा उलटल्याची (Donga overturned) माहिती मिळताच प्रशासनाने (administration) तातडीने शोधमोहिम (Search) हाती घेतली. त्यानंतर दोन महिलेचा मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आला. चंद्रपूर-गडचिरोली (Chandrapur-Gadchiroli) जिल्ह्याला वैनगंगा नदी विभाजते. गडचिरोली जिल्ह्यातील गणपूर (Ganpur) नदीच्या त्या काठावर आहे. एका बाजूला चंद्रपुरातील पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर टोक हे गाव आहे. गावातील शेतकऱ्यांच्या शेतात मिरची तोडणीसाठी (For cutting chillies) गणपूर येथील 12-13 महिला डोंग्याने गंगापूर टोककडे निघाल्या होत्या. अशातच डोंग्याचा तोल बिघडला व तो उलटला. डोंगा उलटताच एकापाठोपाठ त्यातील सर्व महिला नदीच्या प्रवाहात बुडाल्या. पुष्पा मुक्तेश्वर झाडे (वय 42), जिजाबाई दादाजी राऊत ( वय 55) यांचा यात मृत्यू झाला.

रेवंताबाई हरिश्चंद्र झाडे (वय 42), सुषमा राऊत (वय 25), माया राऊत (वय 45), सारणबाई कस्तुरे (वय 60), बुधाबाई राऊत व नावाडी सदाशिव मंढरे आदी अद्यापही बेपत्ता आहेत. नदीत बुडतानाच महिलांनी बचावाचा बराच प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून तातडीन शोध मोहिम हाती घेण्यात आली. चंद्रपूर व गडचिरोली येथील आपत्ती व्यवस्थापनाची टीम (Disaster Management Team) घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीन शोधाशोध सुरू केली. त्यात जिजाबाई आणि पुष्पा या दोघींचे मृतदेह हाती लागले. नावाडी सदाशिव मंडरे व सारूबाई कस्तुरे थोडक्यात बचावले. बुडलेल्या इतरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस आधिकारी मयूर भुजबळ, चामोर्शीचे उपविभागीय महसूल अधिकारी उत्तम तोडसाम, पोभुर्ण्याचे तहसीलदार शिवाजी कदम, चामोर्शीचे प्रशांत घुरडे, पोंभुर्ण्याचे ठाणेदार मनोज गदादे यांच्यासह प्रशासनाची पूर्ण टीम घटनास्थळी तैनात आहे. वैनगंगेच्या पात्रातून सापडलेले मृतदेह चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने