Click Here...👇👇👇

घरगुती वाद विकोपाला गेला, रागाच्या भरात भाच्याने मामाला संपवलं #chandrapur #wardha #murder

Bhairav Diwase

वर्धा:- वर्ध्यात राहणाऱ्या मामा-भाच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या घरगुती मुद्द्यांवरुन वाद होत होता. एक दिवस हा वाद विकोपाला गेला. भाच्याने चक्क मामाच्या डोक्यावर विटेने प्रहार करीत जबर मारहाण केलीय.


आरोपी खुशालने प्रकाश मसराम याच्या डोक्यावर विटेने मारहाण केली. मामा प्रकाशला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून खुशालला घाबरगुंडी सुटल्याने स्वत:ला वाचविण्यासाठी त्याने स्वत:च प्रकाशला उपजिल्हा रुग्णालयात नेले आणि प्रकाश हा दुचाकीवरुन पडल्याने जखमी झाल्याचे सांगितले.


प्रकाश यांना प्राथमिक उपचारानंतर तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले मात्र, प्रकृती नाजूक असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला.


मामाच्या मुलाला दिली ठार मारण्याची धमकी


खुशालने मामा प्रकाशच्या डोक्यावर विटेने मारहाण केल्याची घटना प्रकाशच्या मुलाने डोळ्याने पाहिली होती. मात्र, खुशालने ही बाब कुणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. यामुळे प्रकाशचा मुलगा घाबरला होता. मात्र, वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने मोठे धाडस करीत याची माहिती आईला सांगितली. त्यानंतर प्रकाशची पत्नी कांता हिने याप्रकरणाची तक्रार दिली.