10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक "लाचलुचपत" विभागाच्या जाळ्यात #chandrapur #Brahmapuri #ACB


ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील प्राथमिक शाळेचे शौचालय, मुतारी बांधकाम तसेच मौजा परसोडी जानी येथील अंगणवाडीचे शौचालय, मुतारी व किचन शेडचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार यांना 15 हजारांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला 10 हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.


सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील रहीवासी असुन ठेकेदारीचा व्यवसाय करतो. तकारदार यांनी जिल्हा परीषद चंद्रपूर अंतर्गत 15 व्या वित्त आयोगामधुन सन 2021 ते 2022 च्या दरम्यान ग्रामपंचायत झिलबोडी येथील जिल्हा परीषद प्राथमीक शाळेचे शौचालय, मुतारी घर बांधकाम ईत्यादी कामे व मौजा परसोडी जानी येथील अंगणवाडीचे शौचालय, मुतारी घर बांधकाम व किचन शेडचे बांधकाम ईत्यादी कामे केली होती.

सदर कामाचे एकुण 3,90,000/- रुपये तक्रारदार यांना ग्रामपंचायत कार्यालय झिलबोडी येथील ग्रामसेवक पुरुषोत्तम यशवंत टेंभुर्णे यांनी (कंत्राटदार) तक्रारदार यांना चेकद्वारे देण्यात आले होते. तक्रारदार यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणुन ग्ग्रामपंचायत कार्यालय झिलबोडी येथील ग्रामसेवक पुरुषोत्तम टेंभुर्णे यांनी 15,000 रुपयाची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना गैरअर्जदार यांस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तकार दिली.

प्राप्त तकारीवरुन दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी पडताळणी कार्यवाही करण्यात आली. पडताळणी कार्यवाही दरम्यान लाच रक्कमेची मागणी स्पष्ट झाल्याने व तळजोडीअंती 10,000 रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवीली असल्याने दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाहीदरम्यान गै.अ. ग्रामसेवक यांनी तकारदाराकडे 15,000 रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती 10,000 रुपये गै.अ. पुरुषोत्तम टेंभुर्णे यांनी पंचासमक्ष स्वता लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरू आहे.

सदरची कार्यवाही श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर तसेच श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, नापोशि, संदेश वाघमारे, पो.कॉ. वैभव गाडगे, राकेश जांभुळकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर व चा.पो.कॉ. विनायक वंजारी मो.प.वि. चंद्रपूर यांनी यशस्वी पार पाडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने