20 किलो तांदळाची लाच मागताना महावितरणाच्या तंत्रज्ञाला अटक #chandrapur #Rajura #ACB #acbchandrapur

राजुरा:- लाच घेतल्याचा अनेक घटना घडल्या आहेत. आणि घडत पण आहेत. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१६) २० किलो तांदूळ लाच म्हणून स्वीकारताना एका वरिष्ठ वीज तंत्रज्ञाला अटक केली आहे.


शालेंद्र चांदेकर हा महावितरण राजुरा उपविभागात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता. या घटनेची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.



चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपविभागातील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ शालेंद्र चांदेकर यांनी शेतकऱ्यांना तब्बल २० किलो तांदूळ लाचेच्या स्वरूपात मागितले. या प्रकरणी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चांदेकर यांना लाचेची रक्कम व तांदूळ स्वीकारताना रंगेहात अटक केली.



याबाबत लाचलुचपत विभाग चंद्रपूरच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी माहिती दिली की, शालेंद्र चांदेकर हा जाणूनबुजून शेतकऱ्यांच्या शेतातील वीज बंद करायचा, त्यामुळे कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित व्हायचा. जर वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवायचा असेल, तर प्रत्येक शेतकऱ्यांनी १५०० रुपये जर पैसे नसेल, तर २० किलो तांदूळ प्रत्येक शेतकऱ्याने द्यावे, अशी मागणी चांदेकर यांनी केली होती. विशेष बाब म्हणजे लाचेच्या स्वरूपात तांदूळ मागितल्याची ही पहिलीच घटना जिल्ह्यात घडली आहे, अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या भोसले यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने