गडचांदूर मनसे उप शहराध्यक्ष्यांचा प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश

Bhairav Diwase

कोरपना:- प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या महाराष्ट्रातील अतिशय उत्कृष्ट कार्याला आकर्षित होऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी आज चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे शैलेश विरुटकर, पंकज माणूसमारे, शहर अध्यक्ष आशिष आगरकर, रोहित सूर्तेकर, अनेक कार्यकर्ते च्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

तसेच मनसे माजी उपशहर अध्यक्ष सिद्धेश्वर केंद्रे व अभिमन्यू चव्हाण ( मराठा आंदोलक चंद्रपूर जिल्हा) यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्य पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जनमानसापर्यंत पोहोचण्याची निर्धार केला आहे.