Top News

राष्ट्रसंतांच्या आद्यगुरु संत मंजुळामातेचे कार्य प्रेरणादायी- ॲड. सारिका जेनेकर


राजुरा:- श्रीगुरुदेव सेवा मंडळ राजुरा तालुका व सर्व ग्रामीण व शहरी शाखेचे वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या मातोश्री संत मंजुळामाता यांची पुण्यतिथी निमित्त प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड.राजेंद्र जेनेकर केंद्रीय सदस्य प्रचार विभाग गुरुकुंज आश्रम होते, प्रमुख अतिथी म्हणून लटारु मत्ते, उपाध्यक्ष,ॲड.सारीका जेनेकर चंद्रपूर जिल्हा महिलाप्रमुख, प्रा.नलिनी मेश्राम यांची उपस्थिती होती. 

संत मंजुळामाता व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला अतिथींचे हस्ते पूजन,माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले.यावेळी लटारु मत्ते यांनी कवीतेतून मातृप्रेम जागृत केले, प्रा.नलिनी मेश्राम यांनी आईचे महत्व यांनी समयोचित विचार व्यक्त केले. तर ॲड.सारीका जेनेकर यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना घडविण्यात त्यांच्या आद्यगुरु मातोश्री संत मंजुळामाता चे योगदान आहे त्यांचे संस्कार व शिकवणीमुळे राष्ट्रसंत घडले ते प्रेरणादायी आहे असे विचार व्यक्त केले.ॲड.राजेंद्र जेनेकर यांनी अध्यक्षीय विछार व्यक्त केले,सामुदायिक प्रार्थनेचे महत्वावर सुवर्णा कावळे हिने मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.अश्विनी वांढरे व आभार सुवर्णा कावळे यांनी केले.कार्यक्रमाला श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे महिला व पुरुषांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने