राजुरा येथे डि. एड. १९९६-९८ बॅच चा कौटुंबिक स्नेह मिलन सोहळा.
राजुरा:- सन 1996-98 चे डि. एड शिक्षणशस्त्र अभ्यासक्रम घेणारेसेवेत कार्यरत 50 शिक्षक व शिक्षिका यांनी तब्बल 25 वर्षानंतर एकत्र येऊन मैत्रीचे स्नेह सबध अबाधित राहण्याकरिता कौटुंबिक स्नेह मिलन सोहळा चे आयोजन करून जुन्या आठवणीना उजाळा दिला.
सर्वप्रथम जिल्हयात ब्रम्हपुरी, चिमुर, मुल, चंद्रपूर, वरोरा, राजुरा, जिवती, कोरपना भद्रावती येतालुक्यातील व वाशीम, यवतमाळ व हिंगोली या जिल्यातील कार्यरत असलेले शिक्षक - शिक्षिका या कार्यक्रमाकरिता आवर्जून हजर झाले.
सर्वप्रथम बाहेर जिल्ह्यातील व ज्येष्ठ शिक्षकांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार चिंचोलकर यांनी डि एड. ते आतापर्यंत 25 वर्षांपर्यंतचा लेखाजोखा कथन केला. सर्वाना कुटुंबासोबत बोलावून राष्ट्रासंत तुकडोजी महाराज यांचे विचार शिक्षकाकडुन विद्यार्थांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने प्रत्येकाना ग्रामगिता व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व आपल्या कुटुंबाची माहिती सांगण्यात आली.
यानंतर सर्वांनी एकमेकाच्या कुटुंब व सेवेबद्दल विचारपूस करून पुढील कार्यक्रम घेण्यात आले.यात आपल्यातील आजही असलेले सुप्त गुण जसे गायन, नृत्य, नक्कल, समूह नृत्य, वराडी नक्कल, चारोळी, उखाणे, व इतर कला या ठिकाणी सर्वांनी साकारली. व सर्वात शेवट आठवण म्हणून सर्वांची उपस्थिती असलेलं छायाचित्र भेट देण्यात आले व सर्व एकत्र सहभोजन करून आपआपल्या गावाला परत निघाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं. वैशाली विजय भोयर व सौं. सुचिता संतोष जिरकुंटावर यांनी मनोगत श्रीकृष्ण वडसकर तर आभारप्रदर्शन अरविंद भगत यांनी मानले.
स्वगोत्सुक यजमान मध्ये सुभाष पावडे, साईनाथ परसूटकर, मारोती जिवतोडे,
मनोज सातभाई, सुभाष चिडे, शंकर मेश्राम, बाबू मामीलावाड, सुनिता उमरे,शारदा बेले, संगीता राठोड,उर्मिला लांडे, अर्जुन गायकवाड, स्वतंत्रकुमार शुक्ला , कांचन मुसळे,उत्तम जाधव