तुला तुझ्यावर खरे प्रेम करणारे जीव लावणारे तरी कळतात का?

कश्याच्या मोहात पडली होती तु....
Bhairav Diwase.  
तुला तुझ्यावर खरे प्रेम करणारे जीव लावणारे तरी कळतात का? कश्याच्या मोहात पडली होती तु.
तिची आजी तिला प्रश्न विचारत होती, आणी ती हुंदके देत रडत होती.

काय बरं घङले होते?
तिने ऐकले नाही, गेली त्याच्याबरोबर... त्याचे गाव दुसऱ्या तालुक्यातील ग्रामीण भागात. लग्न करायचे  असे ती हट्टाने म्हणाली.. ! आई वडील यांना धक्काच बसला. शोधाशोध केली ति काही मिळेना... मग तपास लागला त्याच्याबरोबर असल्याचा...!
      आई, वडील यांनी समजावले पण नाही ऐकले तिला ऐकायचे कोठे होते. शेवटी ती तिकडेच राहिली त्याच्याबरोबर... मग काही दिवस गेले मग त्या मुलाच्या घरच्यांच्या जीवनमान लक्षात तिच्या आले. त्यांचे खाणे वेगळेच, तिला काही जमत नव्हते. कसे बसे तग धरून होती. ती म्हणत होती आपण शहरात जाऊन राहू. येथे जंगलात रोज हे काय खाणे.
पण नाही लक्ष दिले. कोण देणार? आजी वडीलांचे कोठे ऐकले. आता कोणाला सांगणार. नंतर काही महिने असेच गेले. जीवन जणू जंगलातील काळोखात जात होते. सकाळ सायंकाळ तलावातील पकडलेले मासे खाण्यात.
      पुढे डिलिव्हरी साठी शहरातील हॉस्पिटलला ॲडमिट केले. परत तिचा नवरा आणी सासु कोणीच पहायला आले नाही. मग होती  फक्त तिची आजी.... तिनेच तिची आणी त्या बाळाची काळजी घेतली.

बघा ना या पळून जाऊन केलेल्या लग्नानंतर आजी तिला समजावुन सांगण्यासाठी ५०-६० किमी गेली होती. पण तिने तेव्हा नाही ऐकले. आजीलाच अपशब्दात बोलली. प्रेशर टाकू नको! मला घरी यायचा फोर्स केला तर मि जहर (विष) घेऊन टाकील अशी धमकी दिली. मग आजीचे काही चालले नाही.
       पण आज जेव्हा एक छोटी मुलगी जन्माला आली. तेव्हा नवरा आणी सासु कोणीच नाही आले दवाखान्यात बघायला. शेवटी आजीच आली. पुढे बरेच महिने मग आजीनेच सांभाळ केला. तो नवरा पहायला पण आला नाही. तेव्हा आजी म्हणाली तिला अजुनही वेळ गेलेली नाही. तु प्रेम केलस त्याच्यावर, घरच्यांचा विरोध पत्करून..... लग्नपण परस्पर केलं आणी बघ हे आता कोण येतयं का?

        एक आजीचं खंबीर होती, नोकरीस होती, हदय तिच्या आणी छोट्या बाळासाठी दुखत होते. म्हणुन हे सर्व आजी करत होती. आणखी दुसरे कोण करू शकले असते. अश्या घटना घडतात. ती एक विचारांची मोहिनी असते. त्या क्षणांना नाही ती कोणाचे ऐकत. आपल्यावर खरे प्रेम करणारे जीव लावणारे कोण? याचा विसर या मोहिनी मुळे पडलेला असतो. ती त्यामुळे कोणाचे ऐकुणच घेत नाही. मग जेव्हा यातील फोलपणा संपुर्ण वास्तव लक्षात येते तेव्हा उशिर झालेला असतो. आता वरील स्टोरीतील मुलगी तर फक्त १७-१८ वर्षाचीच असावी. काय कळत संसाराच? अश्या घटना घडल्या जातात. संबंधित मुलगा यातून मग माघार घेतो आणी मग तिची अडचण निर्माण होते.

      स्वत:ला पुरूष म्हणवणारा हा पळकुटा प्रेमवीर पाहिलो की वाटते... तो कसा असेल आणि त्याचा प्रेम कसा असेल...? पण यात दोष कुणाचा म्हणावं तीचा की त्याचा...?
तीच्या त्या भांभीरीतून ती जागी झाली तेव्हा सहज विचारलो...., कशासाठी हे सारं काही केलीस? काय मिळालं तुला? खरंच तु याला प्रेम म्हणशील का? आई वडीलांनी हेच बघायसाठी तुला आपल्या डोळ्यात साठवलं असेल का? खरंच प्रियकर म्हणवून घेणाऱ्याचं प्रेम हे इतकं प्रभावी असतं का, की तुझ्या अस्तित्वासाठी आई वडीलांनी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन तुला स्वतापेक्षाही जास्त कवटाळलं होतं ते प्रेम कमजोर झालं का? खरंच आई वडिलाची उब ही पळकुट्या प्रियकरापेक्षा कमी होती का?   

#----ती स्तब्ध राहिली अन् म्हणाली... माझी अक्कल माती खायला गेली होती.... पण मी समजलो आहे. प्रेमात ताकत- विकत काही नसते.... जसं जमेल तसं पर्याय शोधायचं असते. 

मला आता एवढंच कळलं...
 #@माती खाली आणि मी इथे आली#

            -सोंगाड्याचा झोरा
                    ७/१२ वर
                        
(टिप:- सदर घटना/ कथा हि काल्पनीक आहे. याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही. जर कुणाचा संबंध आलाच तर तो फक्त योगायोग समजावा)

#आधार न्यूज नेटवर्कवर असेच भन्नाट विषय आपल्या समोर घेऊन येईल.. @सोंगाड्याचा झोरा- ७/१२ वर @या सदरा खाली.... फक्त तुमच्यासाठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत