Top News

दूध विक्री करून परतताना ट्रकने चिरडले, शेतकरी ठार #chandrapur #gadchiroli #accident


गडचिरोली:- दूध विक्री करून गावी परतताना शेतकऱ्याच्या दुचाकीला ट्रकने चिरडले. यात शेतकरी जागीच ठार झाला. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता शहराजवळील आरमोरी रस्त्यावरील कठाणी नदीच्या पुलावर घडली.

मारोती भोयर (५५, रा. महादवाडी ता. गडचिरोली) असे मृताचे नाव आहे. त्यांचा शेतीसह दुग्धव्यवसाय आहे. नित्याप्रमाणे ५ फेब्रुवारी रोजी सकाळी घरोघरी जाऊन ग्राहकांना दूध वाटप केल्यानंतर गुरांसाठी पशुखाद्य खरेदी केले. पेंडीचे पोते व कॅन घेऊन ते दुचाकीवरून ( एमएच ३३ एए- ३७७७) गावी परतत होते. आरमोरी मार्गावरील कठाणी नदीच्या पुलावर पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने (एमएच ३३ डब्ल्यू-२७८६) दुचाकीला जोराची धडक दिली. यानंतर मारोती भोयर हे खाली कोसळले. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर गडचिरोली पोलिसांनी धाव घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने