गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे नाट्यशास्त्र विभागाशी संबंधित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करा:- प्रा. निलेश बेलखेडे #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे सांस्कृतिक दृष्टीने संपन्न जिल्हे आहेत. झाडीपट्टी रंगभूमी या दोन्ही जिल्ह्यात विखुरलेली आहे. शिवाय शेजारच्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात देखील झाडीपट्टी रंगभूमीची नाटके सातत्याने होतात. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात प्रायोगिक नाटकांची चळवळ सक्रिय आहे.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया द्वारे आयोजित राज्य नाट्य स्पर्धा असो वा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार राज्य नाट्य स्पर्धा असो या जिल्ह्यातील नाटय कलावंत राज्य पातळीवर अग्रणी आहेत. ही चळवळ पुढे नेण्यासाठी नव्या पिढीतील तरुण विद्यार्थी नाट्य विषयक शिक्षण घेण्यासाठी इच्छुक व उत्सुक आहेत . मात्र आपल्या विद्यापीठात नाट्यशास्त्र विषयाचे पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांना नागपूर किंवा राज्यातील अन्य ठिकाणी जावे लागत आहे पर्यायाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी या पासून वंचीत देखील राहत आहेत.

नाट्यविषयक शिक्षण घेऊन या जिल्ह्यातील विद्यार्थी नाटय चळवळ अधिक समृद्ध करतील या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठात नाट्यशास्त्र विषयाचे पदविका , पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावे याकरीता शिवसेना-उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित युवासेनाच्या वतीने युवासेना चेपुर्व विदर्भाचे सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांनी कुलगुरू डॉ. बोकारे यांना सविस्तर चर्चा करून निवेदनाद्वारे केली आहे.

सदर विषय अत्यंत जिव्हाळ्याचा , चंद्रपूर च्या मातीशी जुळलेला व महत्वपुर्ण असून यासंदर्भात पाठपुरावा सुरु असून लवकरात लवकर गोंडवाना विद्यापीठात सदर अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल या साठी सकारात्मक भुमिका घेणार असे त्यांनी आश्वासित केले. यावेळी यासंदर्भात प्र कुलगुरू डॉ. कावळे यांच्याशी हि सदर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गोंडवाना सिनेट सदस्य प्रा डॉ प्रविण जोगी यांची सुद्धा उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)