Top News

कोरपना येथे उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात शासनाने मागितला अहवाल #chandrapur #Korpana

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या मागणीची घेतली मुख्यमंत्र्यांनी दखल

कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे उपविभागीय अधिकारी स्थापन करण्यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या निवेदनाची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शासन स्तरावरून दखल घेऊन अधिकाऱ्यांना या संदर्भात स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

कोरपना तालुक्यातील नागरिकांना उपविभागीय कार्यालयाच्या कामाकरिता राजुरा येथे जावे लागत आहे. तसेच कोरपना तालुक्याच्या शेवटच्या टोकावरून राजुरा येथे अंतर ६० किलोमिटर पडत आहे. तालुक्यातील नागरिकांना प्रशासकीय कामाकरिता राजुरा हे अंतर अतिशय लांब पडत आहे.तसेच सदरचे अंतर हे अतिशय लांब असल्यामुळे प्रशासकीय कामे करताना अनेक अडचणी निर्माण होता होत आहे. तसेच तालुक्यातील नागरिकांचा वेळेचा अपव्य व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

कोरपना तालुक्यात ११३ गावे आहे.तसेच तालुक्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १लक्ष १५ हजार ३१७ आहे. तसेच तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ५७९९.२९ हेक्टर आर आहे. तालुक्याची निर्मिती १५ ऑगस्ट १९९२ रोजी झालेली आहे तसेच तालुक्यात २३ तलाठी साजे व ४ महसुली मंडळे आहेत. कोरपना तालुक्यात ४ सिमेंट कंपन्या असून कोळसा खदानी सुद्धा आहेत.त्यामुळे तालुक्यात कामगार वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.तसेच तालुक्यात १ नगरपरिषद व १ नगर पंचायत आहे. त्यामुळे कोरपना येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापन झाल्यास तालुक्यातील नागरिकांना प्रशासकीय कामे करण्यास अत्यंत सुलभ व सोयीचे होणार आहे.
त्याच बाबीची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली.त्याअनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत कार्यासन अधिकारी महसूल व वन विभाग यांना यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार त्यांनी विभागीय आयुक्त नागपुर व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना याबाबत निर्देश दिले.त्यानुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी कोरपना तहसिलदार यांना उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या मार्फत शासनाला सविस्तर माहिती अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सादर करून तसा अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी कोरपना तहसीलदार यांना दिलेले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने