Top News

युवकांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश #chandrapur #pombhurna


पोंभूर्णा:- तालुक्यातील उमरी पोतदार येथील युवकांचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांनी भगवा दुप्पटा घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल करून घेतला. हा कार्यक्रम उमरी पोतदार येथे संपन्न झाला.
पक्षप्रवेश सोहळ्याच्या मार्गदर्शन करताना संदिप गिऱ्हे म्हणाले की, आपण शिवसेना पक्षातील कुटुंबाचे सदस्य झालात याचा मला मनापासून आनंद वाटतो म्हणून तुम्ही सर्वांचे मनापासून अभिनंदन व स्वागत करतो. आपण सर्वांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 80% समाजकारण व 20%राजकारण हा महामंत्र ध्यानी घेऊन गोरगरीब मायबाप जनतेची सेवा करावी नूतन राशन कार्ड गरजूंच्या स्वस्त धान्य पुरवण औषधोपचार विधवा घटस्फोटीत अपंग श्रावणबाळ निराधार योजनेत पात्र लाभार्थ्यांना मदत करा त्यांचे प्रकरणे दाखल करा मतदार नोंदणी करून घ्यावी, जनता जनार्दन च्या समस्या सोडविण्यासाठी तथा त्यांच्या सुखात दु:खात सहभागी व्हा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. शिवसेना पक्ष तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे व्यसनापासून दूर राहा निरोगी व आनंदी जीवन जगा आपल्या हातून समाजाची सेवा घडावी.

पक्षप्रवेश तालुका प्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात व युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार, घनोटी तु.सरपंच पवन गेडाम यांचा पुढाकाराने व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव,युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे,नगरसेवक बालाजी मेश्राम, घनोटी तू.माजी सरपंच कालिदास उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.

प्रवेश करणारे उमरी पोतदार येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती सर्व कार्यकर्ते अध्यक्ष गोकुळ तोडासे व सचिव वैभव ठाकरे,चेतन कुंभरे,अमित कुंभरे ,शुभम भेंडारे,शुभम सिडाम, नदीम कुंभरे, तेजराज सिडाम, चंही चंदा, स्वप्नील ठाकरे ,एन्टी शेंडे,भुषण भांदकर,रंजीत पेन्दोंर,अनिकेत वाढरे,हर्षल सिडाम,मनिष ठाकरे,कुशाल वाढई,विशाल वाढई,राहूल लेनगुरे,स्वप्नील लेनगुरे,नागेश मडावी,आशिष लेनगुरे,शुभम लेनजुरे,महेश पेंन्दार,रामकृष्ण मोहुर्ले,मयुर ठाकरे,गुड्डु मडावी,कुनाल ठाकरे,कुणाल मडावी,मारोती टेकाम,मंगेश टेकाम,चंद्रकात सिडाम, महेन्द्र देवईकर,जितेंद्र देवईकर, अर्जुन एम्प्रेडीवार, नितेश कुभरे, विक्की शेन्डे, अंकुश सिडाम, बादल कुंभरे,अंकीत भन्डारे, साहिल हजारे, सुचित्त रक्षमवार,आशिष पेंन्दोर,मनोज कावळे, गुलाब कुंभरे व आदी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश घेतला.यावेळी कार्यक्रमाला युवकांची लक्षणीय उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने