Top News

शाळेत कबड्डी खेळताना दोन विद्यार्थी गंभीर जखमी #chandrapur #pombhurna


मुख्याध्यापक पिंपळशेंडे म्हणतात शुल्लक बाब!

पोंभुर्णा:- मॉडेल स्कूल म्हणून तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या व सतत चर्चेत राहिलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनगाव येथे कबड्डी खेळताना दोन विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले. एकाच्या डोळ्या जवळ तर दुसऱ्याच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली असून विद्यार्थी रक्तबंबाळ अवस्थेत शाळेतून घरी परतले. परंतु शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शुल्लक बाब माणून या बाबीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांची अवस्था बघून तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांचे वर उपचार सुरू केला. कुंदन महादेव चिंचोलकर वर्ग चौथा, ईशांत शालिक चुधरी वर्ग सातवा अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी आपल्या कर्तव्यात कसूर करत गंभीर रित्या जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना साधा उपचार तर नकोच परंतु त्यांच्या घरी सुद्धा पोचून दिले नाही. शाळेतील विद्यार्थ्यांनीच या जखमी विद्यार्थ्यांना घरी पोहोचवून दिले.
सदर बाबीची माहिती सरपंच राहुल भाऊ पाल, व माजी सरपंच जीवनदास गेडाम यांना होताच त्यांनी गुरुवारी जीप शाळा गाठली. शाळेत उपस्थित असलेले मुख्याध्यापक पिंपळशेंडे यांच्याशी भेट घेऊन सदर प्रकरणी विचारणा केली असता, शुल्लक बाब असल्यामुळे आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो नाही. असे बेजबाबदारीपणाचे व हास्यास्पद उत्तर दिले.

एकीकडे दोन्ही विद्यार्थी रक्तबंबाळ झालेले असताना मुख्याध्यापक शुल्लक बाब मानत आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार मुख्याध्यापकावर तात्काळ प्रभावाने निलंबनाची कारवाई करून गुन्हा दाखल करावा,अशी मागणी पालकांनी व सरपंच राहुल भाऊ पाल यांनी केली आहे.
जखमी विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी आज दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी सरपंच राहुल भाऊ पाल व माजी माजी सरपंच जीवनदास गेडाम यांच्या नेतृत्वात गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठून तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीच्या प्रति जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री, नामदार सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांना पाठवलेले आहेत. या प्रकरणी कृषी शिक्षकांवर काय कारवाई होते याकडे पालकांचे लक्ष लागलेले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने