Top News

नोकरीच्या लोभात घरीच मारला 10.24 लाखांवर डल्ला #wardha #chandrapur #theft


दोघा मित्रांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या


वर्धा:- स्वत:च्या घरी मित्राच्या मदतीने चोरी करून मुलाने चक्क दागिने आणि रोख रकमेसह 10 लाख 24 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकत चौकशी केली असता मुलाने नोकरी मिळवून देण्याच्या लालसेतून मित्राच्या मदतीने चोरी केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात पुढे आले. पोलिसांनी चोरीतील सर्व मुद्देमाल रिकव्हर करीत गुन्हा उघड केला.


सिंदी मेघे परिसरातील घरपुरे लेआऊट परिसरातील रहिवासी गोपाल यादव याच्या घरातून त्यांचाच मुलगा यश आणि त्याचा मित्र सारंग घरजाळे याने 4 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम आणि दागिने असा 10 लाख 34 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. पोलिसांनी यादव कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. दरम्यान मुलगा यशने दिलेल्या माहितीवर संशय निर्माण झाल्याने त्याला ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवला असता सारंग घरजाळे याने नोकरी लावून देण्यासाठी पैसे मागितले होते.


यशने सारंगला काही पैसे दिले होते. मात्र, आणखी पैसे त्यास द्यावे लागणार असल्याने यशने सारंगला सोबत घेत स्वत:च्याच घरात चोरी करण्याचा बेत आखून दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी यश यादव आणि त्याचा मित्र सारंग घरजाळे या दोघांना अटक करून संपूर्ण मुद्देमाल रिकव्हर केला.


ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या निर्देशात पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख, दिनेश कांबळे, धर्मेद्र अकाली, अजय अनंतवार, गणेश सातपुते यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने