अशोक चव्हाणांनी दिला आमदारकीचा राजीनामा #AshokChauhan #chandrapur #Mumbai #Maharashtra

Bhairav Diwase


अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याची शक्यता?

मुंबई:- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे.


अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.


अशोक चव्हाण यांचं ट्विट


आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.

Today i.e. on Monday, February 12, 2024, I have tendered my resignation as Member of Legislative Assembly (MLA) from 85-Bhokar Assembly Constituency to the Assembly Speaker Rahulji Narvekar.


अशोक चव्हाणांनी आपला बायो बद्दलला