Top News

जिल्ह्यात SRPF जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या #Gadchiroli #chandrapur #SRPF


गडचिरोली:- गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यांतून धक्कादायक घटना समोर आली आहे, गडचिरोली जिल्हाधिकारी Collector यांच्या निवस्थानावर Residence कार्यरत असलेल्या एसआरपीएफ (SRPF) च्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना दि. 12 फेब्रुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. उत्तम श्रीरामे (Uttam Shrirame) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.
उत्तम श्रीरामे हे गडचिरोली येथील जिल्हाधिकारी यांच्या निवास्थानावर कार्यरत होते अशी माहिती आहे. मात्र आज अचानक त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. सदर घटनेने पोलीस विभागासह (Police Department) जिल्हाभरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने