Top News

मी अशोक चव्हाणांसोबत जाणार नाही, आमदार धोटेंची प्रतिक्रिया #chandrapur #Rajura


राजुराचे आमदार सुभाष धोटेंकडून भूमिका स्पष्ट
चंद्रपूर:- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तसेच समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यातून काही तरी खोडसाळपणा दिसून येत आहे. मी स्वतः आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व आमदार हे काँग्रेसचे निष्ठावंत सैनिक आहोत.

आमचे कुटुंब माझ्या वडिलांपासून काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत आहे. मी अगदी युवा अवस्थे पासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आलेलो आहे आणि सदैव काँग्रेस पक्षाचेच काम करीत राहणार आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाची विचारसरणी, पुरोगामी विचारधारा यासह घट्ट बांधलेले आहोत.

माझ्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील कोणीही काँग्रेस आमदार भाजप मध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या बातम्या निराधार आणि खोडसाळ असून चंद्रपूर जिल्हातील माझ्या व काही काँग्रेस आमदारांबाबतचे वृत्त पुर्णपणे निराधार आहे.

आम्ही सर्व काँग्रेसचे निष्ठावंत काँग्रेसमध्येच आहोत. कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या बाजूने वातावरण असून चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा सह जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येण्याची पुर्ण शक्यता आहे अशी प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने