दबंग आगार प्रमुख येताच कामचोरांचे धाबे दणाणले

Bhairav Diwase

एसटी चे उत्पन्न वाढले व लालपरी ही अगदी वेळेवर आणि पूर्ण किलोमिटर पर्यंत आनंदाने रस्त्यावर धावू लागली

जे काम हे आगार प्रमुख करू शकले ते इतर आगार प्रमुख का नाही केले जनतेचा केविलवाणा प्रश्न?

राजुरा:- काही वर्षांपासून राजुरा एसटी आगाराला ग्रहण लागले असल्याचे पाहायला मिळत होते , बसेस वेळेवर न येणे, बसेस रद्द होणे, बसेस मधे बिघाड येणे, तिकीट मशीन मधे बिघाड येणे, चालक कमी असणे, वाहक कमी असणे, चालक ओटीवर असणे, वाहक ओटीवर असणे, अचानक चालकाची प्रकृती बिघडने, अचानक वाहकाची प्रकृती बिघडने, डेपोत डिझेल नसणे, मार्गावर प्रवाशी/ उत्पन्न नसणे इत्यादी ठरलेले कारणे सांगून बसेस नियमित चालत नव्हती, बस स्थानक प्रमुख बसस्थानकावर बसत नव्हते .... परंतु या सर्व बाबींचा अभ्यास करून आत्ताच आलेले नवनियुक्त आगार प्रमुख श्री. मनोज डोंगरकर यांनी स्वतः कामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करत आहेत त्यामुळे राजुरा बस आगारातून बसेस नियमित आणि वेळेवर निगत आहेत व पूर्ण किलोमिटर अंतर सहज पार करीत आहेत, प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद वाक्य असलेली एसटी आता खरंच प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर सेवा देत असल्याचे पाहायला मिळत आहे, प्रवाशांमध्ये लालपरी बद्दल आणि नव्याने रुजू झालेल्या एसटी चे आगार प्रमुख मनोज डोंगरकर यांच्या बद्दल कमालीची आस्था, आनंद वेक्त होत आहे,

याचे कारणही तसेच आहे कारण कित्तेक वर्षांपासून राजुरा आगारात असे नियमबद्द अधिकारी आलेच नाही आले ते फक्त पैसे कमावण्यासाठी त्यामुळे वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने राजुरा डेपो चर्चेत राहत होता परंतु आता चांगल्या कामामुळे चर्चेत आहे हे खरंच कौवतुकास्पद आहे...

प्रत्येक नानाल्या दोन बाजू असतात त्याच प्रमाणे आपल्याला इते पण पाहायला मिळत आहे. प्रवाशी सुखावले मात्र काम चोर आणि निष्काळजी चालक वाहक व इतर कर्मचारी यांच्या पोटात दुकने सुरू झाले. कारण काही चालक वाहक हे अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून फिक्स शेड्युल चालत होते व पूर्ण किलोमिटर फेरी मारत नव्हते जे की रोटेशन नुसार चालायला पाहिजे आणि शेड्युल नुसार किलोमिटर पूर्ण करायला पाहिजे, बस फलाट क्रमांक नुसार लावल्या जात नाही , प्रवाश्यांना तिकीट फुसट देतात व झीरो ची तिकीट फाडून पैसे घेणे असे अनेक शकली लडविल्या जात आहे, यामुळे जे चालक वाहक खरोखर प्रामाणिक कार्य करीत आहेत त्यांची मात्र चांगलीच पिळवणूक होत आहे, परंतु आता नवीन आगार व्यवस्थापक येताच कामचुकार व्यवस्ताच बदलली रोटेशन पद्दत आली किलोमिटर पूर्ण करणे अनिवार्य झाले. राजुरा परिसरातील नागरिक आनंदी होऊन हेच अधिकारी नियमित राहावे आणि लालपरी अशीच वेळेवर याव्ही अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.