Top News

वेळवा मालचे उपसरपंच पदी शिवसेना (उबाठा) गटाचे अतुल जाधव यांची बिनविरोध निवड #chandrapur #pombhurna

पोंभूर्णा:- वेळवा मालचे उपसरपंच जितेंद्र मानकर यांची सरपंच पदी निवड झाल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक आज झाली. यासाठी अतुल जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाली.

या प्रसंगी माजी सरपंच जितेंद्र मानकर ग्रामपंचायत सदस्य सीमा निमसकार, सुरेखा कुडमेथे,वनिता येरमे, अर्जणा कोत्तपलीवार ममता जाधव उपस्थित होते.तसेच शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार,नगरसेवक बालाजी मेश्राम,महेश श्रिगीरीवार,भाऊजी कुडमेथे, मधुकर मेश्राम, वनवासू येरमे,विलास कामीडवार,समीर लोणारे, मुन्ना लोणारे,अनिल मडावी, प्राशिक मानकर व आदी उपस्थित होता.

निवडणूक अधिकारी म्हणून कृषी विस्तार अधिकारी वाकुडकर,ग्रामसेवक तेलमासरे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडले. यावेळी नवनियुक्त उपसरपंच अतुल जाधव यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे व इजी.निलेश लोणारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने