आईने व्यसन सोडायला सांगितले, मुलाने जीवनच संपवले #chandrapur #Gondpipari #suicide

Bhairav Diwase
0

गोंडपिपरी:- व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाला पोलिस पाटील असलेल्या आईने व्यसन सोडविण्याची वारंवार विनंती केली, मात्र आईची ही विनंती न ऐकता मुलाने थेट जीवनच संपविल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे घडली. रक्षक रवींद्र रामटेके (२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवार दि. १० फेब्रुवारीला रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.


बोरगाव येथील पोलिस पाटील योगिता रामटेके यांचा मुलगा व्यसनांच्या आहारी गेला होता. शनिवारी घरातील सदस्य बाहेर असल्याची संधी साधून रक्षकने घरात गळफास घेत जीवनयात्रा संपवली. त्याची आई त्याला व्यसन सोडायला नेहमी सांगायची, मात्र त्याने जीवनच संपवले. त्याच्या पश्चात आई, वडील आजोबा, बहीण असा आप्त परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)