बरांज येथील 'त्या' महिलांनी सुरु केला अन्नत्याग #chandrapur #Bhadrawati

Bhairav Diwase
0
भद्रावती:- प्रलंबित मागण्यासाठी केपीसीएल कंपनी विरोधात बरांज येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी मागील ६१ दिवसांपासून आंदोलन सुरु केले - आहे. यातील दहा महिलांनी मागील - तीन दिवसांपासून थेट कोळसा - खाणीच्या खड्यात उतरून आंदोलन सुरु केले. कंपनी व जिल्हा प्रशासन लेखी पत्र देणार नाही, तोपर्यंत खड्याच्या बाहेर निघणार नाही, यावर - महिला ठाम आहे. दरम्यान, रविवार दि. ११ फेब्रुवारीपासून या महिलांनी अन्नत्याग केला आहे. त्यामुळे

आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. उपविभागीय अधिकारी मधुनंदा लंगडापुरे यांनी आंदोलन करणाऱ्या दहा महिलांची खाणीच्या खड्ड्यात जाऊन भेट घेतली, यावेळी खाणीच्या बाहेर निघण्याबाबत सूचना केल्या. मात्र महिला आपल्या मागण्यांवर ठाम आहे. परिणामी कोणताही तोडगा निघू शकला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)