पोंभुर्णा:- जातीनिहाय जनगणना करावी मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊ नये या प्रमुख मागणीसह ओबीसी युवा अधिकार मंच व संघर्ष वाहिनीच्या माध्यमातून वर्धा येथून ३ फेब्रुवारीपासून ओबीसी जनगणना संकल्प यात्रा निघाली आहे, ही यात्रा शुक्रवारी बल्लारपूर, मुल व पोंभुर्णा येथे दाखल झाली. यावेळी रॅलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील सभेनंतर ही रॅली पोंभूर्णा शहरात दाखल झाली. यात्रेचे सारथी उमेश कोराम, अनिल डहाके, अँड पुरुषोत्तम सातपुते, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाशपाटील मारकवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर यात्रेचे पोंभुर्णा शहरात नगर पंचायतीचे नगरसेवक गणेश वासलवार, नगरसेवक अभिषेक बद्दलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी श्रीकांत शेंडे, अमोल ढोले, राजू निलमवार, आशिष कावळे, अमित कानमपल्लीवार, रुपेश मेश्राम, निखील गोरंतवार, संजय गेलकीवार, अरविंद सातपुते, किशोर गुज्जनवार इतर असंख्य ओबीसी कार्यकर्ते हजर होते.