Top News

चंद्रपूर जिल्ह्यात शुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या #chandrapur #Brahmapuri #murder

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथे पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना दि. 12 फेब्रुवारी ला सकाळी उघडकीस आली. हिरकण्या जयदेव पिल्लेवान असे मृतक महिलेचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, आरोपी जयदेव पिल्लेवान (60) रा. मालडोंगरी व मृतक हिरकण्या जयदेव पिल्लेवान यांच्यात मागील 2-3 दिवसापासून रोज भांडण होत होते.12 फेब्रुवारीला सकाळी 7.00 वाजता जॅकीस ला त्याची आई हिरकण्या जयदेव पिल्लेवान (50) ही मृतावस्थेत पडलेली दिसली. आईला वडिलांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने डोक्याला व चेहऱ्याला मार लागल्याने ती मरण पावली अशी माहिती पोलीस ठाण्यात दिली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी जयदेव पिल्लेवान वय (60) यांचेवर अ.क्र. 71/24 कलम 302 भादवी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात अली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने