लॉटरी सेंटरच्या नावावर चालायचा ऑनलाईन जुगार #chandrapur


पोलिसांना माहिती मिळाली अन्...

नागपूर:- कपिलनगर ठाण्यांतर्गत लॉटरी सेंटरच्या नावावर सुरू असलेल्या ऑनलाईन जुगारावर झोन 5 चे डीसीपी निकेतन कदम यांच्या विशेष पथकाने धाड टाकली. यावेळी 9 जुगाऱ्यांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून 1.45 लाख रुपयांचा मालही जप्त करण्यात आला.

राकेश रामवृक्ष रावत (वय 47, रा. अग्रसेननगर, भिलगाव), आकाश प्रकाश नारनवरे (वय 37, रा. यशोधरानगर), राकेश देवानंद डोंगरे (वय 28, रा. भीमवाडा झोपडपट्टी), सुरेश धोरणलाल नेवारे (वय 38, रा. मनीनगर झोपडपट्टी, कामठी रोड), अनिल रमेश शिरसीकर (वय 32, रा. माजरी), राजेश एकनाथ पखिड्डे (वय 51, रा. रमानगर, कामठी), गोमलाल परसराम यादव (वय 57, रा. गोविंदगड, उप्पलवाडी), आवेश जलधर लोखंडे (वय 43, रा. विश्व भारतीनगर) आणि वसंतदादा देवगिरीकर (वय 60), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जुगार अड्डा भरवणारा राजेश नंदनवार (रा. मानेवाडा) फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कामठी रोडवर भिलगाव परिसरातील राज लॉटरी सेंटरमध्ये ऑनलाईन जुगार खेळला जात असून, राजेश नंदनवार (रा. मानेवाडा), हा याचा संचालक असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीवरून शनिवारी रात्री पोलिसांनी लॉटरी सेंटरवर धाड टाकली. आरोपी संगणकावर लकी 7 आणि डबल चान्स नावाचा जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 18,500 रुपये रोख, 3 एलसीडी मॉनिटर, सीपीयू, प्रिंटर आणि 7 मोबाईल फोनसह 1.45 लाख रुपयांचा माल जप्त केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने