चंद्रपूर:- माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा राजीनामा आमच्यासाठी धक्कादायक आहे. मात्र, त्यांनी अचानक का निर्णय घेतला माहित नाही. अलीकडे त्यांची माझ्याशी चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. आपण कुठेही जात नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, मी २००७ पासून त्यांच्या बरोबर काम केले आहे. मंत्रिमंडळात दोनदा होतो. अतिशय सौहार्दपूर्ण संबंध असल्यानेच कदाचित चर्चा होत आहे. ते गेले म्हणून विजय वडेट्टीवार पण जातील, पण त्यात तथ्य नाही, मी मतदारसंघात फिरत आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. मात्र, ज्या पद्धतीने पक्ष भाजप फोडत आहेत, मतदार राजा या फुटीला वैतागला आहे. मतदार नक्कीच आगामी निवडणुकीत धडा शिकवतील, असेही ते म्हणाले. चव्हाण कसल्यातरी चौकशीच्या चिंतेत असल्याची माहिती मिळाल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
Tags