Top News

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार? #Chandrapur #Maharashtra #Mumbai

मुंबई:- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता.

त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करु, असे त्यांनी सांगितलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात असल्याचं वक्तव्य केले होते. आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी भाजपच्या कार्यलयात जय्यत तयारी सुरु आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने