Top News

निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला #jalgaon #attack


लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण


जळगाव:- जिल्ह्यातील वाळू माफियांची (Sand Mafia) मुजोरी दिवसेंदिवस वाढतच असून एका महिन्यात दोन महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला (Attack) करण्यात आला होता. याचदरम्यान 6 फेब्रुवारीला रात्री 11 वाजेच्या सुमारास नशिराबाद ते तरसोद दरम्यान वाळूमाफियांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली. (Jalgaon)

यावेळी हल्लेखोरांनी अधिकाऱ्यांचे वाहन देखील फोडले आहे. या हल्ल्यात निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार (Resident Collector) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णलायत (District Hospital) उपचार सुरू आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने