आई आणि मोठ्या भावाने मिळून लहान भावाची केली हत्या #latur #murder

Bhairav Diwase
0
लातूर:- लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील तुंगी गावात मोठ्या भावानेच सख्या लहान भावाचा स्वतःच्या आईच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश जाधव (वय 23) असं मृत तरुणाचं नाव आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.
अभ्यासासाठी आई ओरडली म्हणून 13 वर्षीय मुलाने उचललं टोकाचं पाऊल

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलिसांनी सखोल चौकशीनंतर आई आणि मुलावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. २८ जानेवारी रोजी ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन जाधव या तरुणाने औसा पोलीस ठाण्यात भावाने आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. माझा भाऊ योगेशने शेतातील पत्र्याच्या शेडला लटकून गळफास घेत आत्महत्या केली आहे, असं त्याने म्हटलं होतं. त्यामुळे पोलिसांनी योगेश ची आकस्मात मृत्यूची नोंद केली.

पुढे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. त्यावेळी चौकशी करताना त्यांना संशयास्पद गोष्टी जाणवल्या. त्यावर पोलिसांनी तपासाची सूत्र आणखी फिरवली आणि सत्य समोर आलं. योगेश सतत दारू पिऊन यायचा. घरामध्ये भांडणं करायचा त्यामुळे त्याच्या आईने आणि भावाने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला.

दोघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. ही हत्या नसून आत्महत्या आहे हे भासवण्यासाठी या दोघांनी बनाव रचला. आधी त्यांनी शेतात फाशी घेताना वापरली जाणारी दोरी लटकवली आणि योगेशला देथे नेऊन गळफास दिल्यासारखे भासवले. पोलिसांनी आता आई आणि भावला ताब्यात घेतलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)