Top News

Botanical Garden: १० दिवसात बॉटनिकल गार्डनला ६० हजार १८९ पर्यटकांची भेट

उद्घाटनाच्या दिवशी ६ हजार तर रविवारला १६ हजार ११५ ची नोंद

जागतिक दर्जाचे गार्डनला पर्यटकांचा शिक्कामोर्तब

बल्लारपूर:- अनेक दिवसांपासून उद्घाटनेच्या प्रतीक्षेत असलेल्या देशाच्या निवडक बॉटनिकल गार्डनमध्ये नव्याने भर पडत असलेल्या जागतिक दर्जाचे विसापूर येथिल देशातील १२३ वे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण १२ मार्चला ,मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. तेंव्हा पासून गार्डनला भेट देणाऱ्या पर्यटकांची गर्दी दिवसान दिवस वाढतच आहे. १३ ते २२ मार्च अशा १० दिवसात ६० हजार १८९ पर्यटकांनी भेट देवून अल्पावधितच गार्डनला पर्यटकांनी जागतिक दर्जावर जणु काही शिक्कामोर्तब केल्याचे वाटत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा नंतर पर्यटनात भर पडणारे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन विसापूर हे आपल्या उद्घटनापासूनच देशात आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले आहे. जागतिक दर्जाचे पर्यटनाचे नवीन दालन खुलणाऱ्या या गार्डन मध्ये १२ मार्च उद्घाटनाच्या दिवशी ६ हजार नागरिकांनी भेट दिली तर रविवार दिनांक १७ मार्चला १६ हजार ११५ पर्यटकांनी भेट देवून गर्दीचा उच्चांक प्रस्थापित केला १३ ते २३ मार्च १० दिवसात तब्बल ६० हजार १८९ व उद्घाटनाच्या दिवशीची संख्या जोडली तर ६६ हजार१८९ पर्यटकांनी भेट दिली.

२३८.२९ कोटी खर्च करून निर्माण करण्यात आले. हे गार्डन १०८ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले आहे. यामध्ये कंझर्वेशन झोन ९४ हेक्टर व रिक्रीएशन झोन १४ हेक्टर चा समावेश आहे कंझर्वेशन झोन मध्ये १२०० वेगवेगळ्या प्रजातीची दुर्मिळ रोपे लावण्यात आलेली आहेत. या झोन मध्ये खुले पॉमेटम, बोन्साय गार्डन, बोगनवेलीया गार्डन, विविध जलमृद संधारण, जलाशय ट्री हाऊस व विवध प्रकारचे झाडे आणि तलावांचा समावेश करण्यात आलेला आहे. रिक्रीएशन झोनमध्ये मेंन एंट्रन्स गेट, एडमिन बिल्डिंग, बायोडायव्हर्सिटी इंटरप्रिटेशन सेंटर, स्टॅच्यू ऑफ नेचर, फाउंटन, रोज गार्डन, श्रबरी गार्डन, नॅचरल हिस्ट्री म्युझियम, बटरफ्लाय गार्डन सायन्स सेंटर, प्लॅनेटएरियम,, एक्वेरियम, एवोल्युशन पार्क, बगौंविल्ले गार्डन, मॅथेमॅटिक्स पार्क, मेडिकल गार्डन, एक्जीबिशन सेंटर, ग्लास हाऊस व मेज यांचा समावेश आहे. ते पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी होत असून पार्किंग पूर्ण हाऊसफुल होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने