Top News

चुकीची कारवाई कराल तर त्याचे तीव्र पडसाद भोगावे लागतील:- आशिष देवतळे #chandrapur #ballarpur

रेल्वे प्रशासनाच्या कारवाई विरोधात उपविभागीय कार्यालयात निवेदन

बल्लारपूर:- बल्लारपूर शहरातील गणपती वार्डात जवळपास 50 वर्षापासून अनेक नागरिक स्वतःची घरे बांधून राहत आहे यामध्ये काही घरे रेल्वेच्या जागेवर आहे तर बहुतांश घरे नजूलच्या जागेवर आणि काही घरांना पट्टा सुद्धा असून रेल्वे कडून 7 जुलै 2023 ला नोटीस देण्यात आली ज्यामध्ये त्यांनी कागदपत्रांची मागणी केली त्यावेळी सर्व नागरिकांनी घराचे जे काही कागदपत्रे आहे ते रेल्वे कार्यालयात जमा केले.

तसेच नेहमी सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाणारे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची समस्त नागरिकांनी भेट घेतली आणि सुधीर भाऊंनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार करून कारवाई थांबवून सर्वसामान्य जनतेला एक मोठी मदत केली. परंतु त्यानंतर 15 मार्च 2024 ला परत एकदा नोटीस आले ज्यामध्ये पंधरा दिवसाच्या आत घर खाली करा अन्यथा बल प्रयोग करून घर खाली करण्यात येईल अशा प्रकारे दडपशाही करणारे नोटीस रेल्वे अधिकाऱ्याकडून आल्यामुळे स्थानिक जनतेत रोष निर्माण झाला आहे. यानंतर संपूर्ण नागरिकांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव श्री.आशिष देवतळे यांच्याकडे धाव घेतली असता त्यांनी वेळ न गमावता फोनच्या माध्यमातून सुधीर भाऊंशी चर्चा केली तसेच दिनांक 16 मार्च रोजी उपविभागीय कार्यालय बल्लारपूर येथे समस्त नागरिकांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार श्री.फुलझेले साहेब यांना निवेदन दिले ज्यामध्ये सांगण्यात आले की जोपर्यंत भूमी अभिलेख कार्यालय व रेल्वे अधिकाऱ्यांकडून जॉईंट सर्वे करून रेल्वेची जागा निश्चित होत नाही तोपर्यंत रेल्वे कडून कोणतीही कारवाई करू नये अन्यथा याचे पडसाद रेल्वे प्रशासनाला भोगावे लागतील अशी चेतावणी श्री.आशिष देवतळे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी बल्लारपूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने