Top News

आशीर्वाद द्यायला फडणवीस आले, आता विजय निश्चित:- सुधीर मुनगंटीवार #chandrapur #chandrapurloksabha

चंद्रपूर:- ज्यांच्या नावाच्या सुरुवातीला देव या नावाचा उल्लेख आहे. ते स्वत: जर शुभेच्छा द्यायला आले असतील तर, जगातली कोणतीच शक्ती जनतेच्या विजयाला रोखू शकत नाही, असं म्हणत महायुतीच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना इशारा दिला.


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विदर्भातून पहिला उमेदवारी अर्ज सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला आहे. या मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी लढत होणार आहे. 


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपुरात सभा झाली. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीत इतर पक्षाचे नेतेमंडळी उपस्थित होते. या सभेत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. "जातीपातीच्या माध्यमातून कोणी प्रचार करत असेल तर, तो त्याच्या पायवर दगड मारून घेत असेल. तुम्ही जर जातीचे नेतृत्व करत असाल तर, इतर जातीच्या लोकांनी कोणत्या नेत्यांकडे यचे. इथे सर्वच समजा मोठे आहेत. पण तुम्ही एकाच जातीसाठी उभे आहेत का, असे मला विचारले तर मी त्यांना उत्तर दिले की, मी जातीपातीचे राजकारण न करता सर्वच जातीपातीच्या नागरिकांसाठी काम करीन. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आमचा संकल्प आहे. आमचं टार्गेच खूप मोठं आहे. पंतप्रधान मोदींच्या गॅरेंटीमध्ये चंद्रपूर लोकसभेची ही गॅरेंटी आहे की, आम्ही कधीही जातीपातीचे राजकारण करणार नाही", असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

"मागे मंचावर कोण बसलं आहे, हे बघता आलं नाही. पण तरीही या मंचावरील उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय गटाचे सर्व कर्णधार, नेते पदाधिकारी पण जर मी कोणाचे नाव घेतलं नसेल कुणी पाय आपटू नका. कारण पाय आपटले तर, निवडणुकीत आपटण्याची शक्यात निर्माण होईल. या आशिर्वाद सभेला मी महाकाली देवीचा आर्शिवाद घेऊन आलो आहे. पण ज्यांच्या नावाच्या सुरुवातीला देव या नावाचा उल्लेख आहे. ते स्वत: जर शुभेच्छा द्यायला आले असतील तर, जगातली कोणतीच शक्ती जनतेच्या विजयाला रोखू शकत नाही", असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

"काल मी पोहरादेवीत असून आई जगदंबेचा आशिर्वाद घेतला. बंजारा समाजाचीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक युद्धात ओठांवर आई जगदंबेचे नाव यायचे. जगदंब म्हटल्यावर अशी तलवार चालायची की तलवार दिसत नव्हती पण शत्रूंचे धड वेगळे होताना दिसायचं. त्यामुळेच आई जगदंबेचा आशिर्वाद घेऊन मी इथे आलो", असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

"माझ्यावर महायुतीचा कोणताच कार्यकर्ता कृत्रिम प्रेम करत नाही. तर प्रत्येक कार्यकर्त्याचे माझ्यावर नैसर्गिक प्रेम असून अबकी बार 400 पारचा भाव घेऊन तो माझ्याकडे येतो. महायुतीत इतर पक्ष मला भावनेने महत्त्वाच्या टीप्स देत असतात. त्यामुळे मला वाटतं की, ही निवडणूक माझी नाही तर ही निवडणूक तुमची आहे. विजय झाला तर माजायचं नाही. पराभव झाला तर लाजायचं नाही. अरे जीत का हमे गर्व, हार की हमे शर्म नही है, तेरा वैभव अमर रहें माँ, हम भी चार रहे या न रहे… हा भाव घेऊन आम्ही काम करत आहोत", अशा शायरी म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

"विश्वगौरव नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सर्वोच्च बिंदूवर जाण्याची तयारी करत आहे. त्यामुळे मी समजतो की, आमचे शेकडो वर्षांचे पुण्य असेल की, भारतमातेच्या गर्भात आमचा जन्म झाला. पण या देशाच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी, श्रद्धेय लालकृष्ण आडवाणी आणि श्रद्धेय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे आमचे सौभाग्य आहे", असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने