Top News

चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाचे "विशेष ऑल आऊट ऑपरेशन" #chandrapur #Chandrapurpolice


स्वतः पोलिस अधिक्षक व अपर पोलिस अधिक्षक कारवाईसाठी मैदानात

चंद्रपूर:- भारत सरकार च्या निवडणुक आयोग यांनी सार्वजनिक लोकसभा निवडणुक 2024 जाहिर केलेले असुन वणी-आर्णी-चंद्रपूर या लोकसभा निर्वाचन क्षेत्राची मतदान घेण्याची तारीख 19 एप्रिल 2024 रोजी निश्चित केलेली असुन सदरची निवडणुक ही सुरळीत व शांततेत होण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन दिनांक 19 मार्च 2024 चे रात्रौ 12 वाजता ते दिनांक 20 मार्च 2024 चे सकाळी 6 वाजेपर्यंत स्वतः पोलिस अधिक्षक व अपर पोलिस अधिक्षक, चंद्रपुर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत ऑल आऊट ऑपरेशन व 35 नाकाबंदी पॉईन्ट लावुन मोहिम राबविण्यात आली.


सदर मोहिमेच्या दरम्यान 78 हॉटेल, लॉजेस, धाबे चेक करण्यात आले. 821 वाहनाची तपासणी करुन 64 वाहनावर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करुन त्यांच्याकडुन 10,700/- रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मोहिमे दरम्यान रेकॉर्ड वरील फरार तसेच पाहिजे असलेले आरोपी, कारागृहातुन सुटलेले एकुण 154 आरोपींना चेक करण्यात आलेले असुन मा. न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यातील 160 समन्स बजावणी करुन 61 आरोपींना पकड वॉरन्टद्वारे अटक करुन गजाआड करण्यात आले.

ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान अवैध दारु बाळगणाऱ्यावर 22 केसेस करण्यात आल्या आहे. तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्याविरुध्द पोलिस स्टेशन रामनगर येथे 1 व पोलिस स्टेशन बल्लारशा येथे 2 केसेस भारतीय हत्यार कायदयान्वये एकुण-3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधीत तंबाखु बाळगणाऱ्या इसमाविरुध्द अन्न सुरक्षा अधिनियम-2006 अन्वये पोलिस स्टेशन राजुरा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने गुन्हा नोंद करुन त्याचेकडुन 3,36,200 /- रुपयाचा माल व वाहन किंमत 5,00,000/- रुपये असा एकुण 8,36,200 /- रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर ऑल आऊट ऑपरेशनमध्ये मुम्मका सुदर्शन, पोलिस अधिक्षक, चंद्रपुर यांचे नेतृत्वात रिना जनबंधु, अपर पोलिस अधिक्षक, चंद्रपुर, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, चंद्रपुर जिल्हा तसेच जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन मधील 52 पोलिस अधिकारी व 265 पोलिस अंमलदार यांनी मोहिमेमध्ये भाग घेतलेला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने