Top News

पोंभूर्ण्यातील ४९ केंद्रातून ६७७ निरक्षरांनी दिली परिक्षा #chandrapur #pombhurna #exam

पोंभूर्णा:- केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवार दि.१७ मार्चला निरक्षरांची पायाभूत साक्षरता आणि मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात आली.पोंभूर्णा तालुक्यातील ४९ केंद्रातून ६७७ निरक्षरांनी परीक्षा दिली.परीक्षेमध्ये वाचन,लेखन आणि संख्याज्ञान अशा तीन भागांत परीक्षा घेण्यात आली होती.जेष्ठ निरक्षरांनी परिक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.

शासनाच्या निर्देशानुसार ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा असाक्षर व्यक्तींसाठी शाळेमध्ये १० ते ५ या वेळात पेपर आयोजित करण्यात आले होते.तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या या परीक्षेमध्ये वाचन, लेखन आणि संख्याज्ञान अशा तीन भागांत परीक्षा घेण्यात आली होती. प्रत्येकी ५० या प्रमाणे १५० गुणांची ही परीक्षा होती. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागात किमान ३३ गुण आवश्यक आहेत. सदर पेपर हा तीन तासांचा होता.दिव्यांग व्यक्तींसाठी अर्ध्या तासाचा अधिकचा वेळ देण्यात आला होता.पोंभूर्णा तालुक्यातील ४९ केंद्रातून ६७७ निरक्षरांनी परीक्षा दिली.सदर परिक्षा यशस्वी करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक,केंद्रसंचालक, गटशिक्षणाधिकारी यांनी काम पाहिले.

पोंभूर्ण्यात ४९ केंद्रातून ६७७ निरक्षरांनी परीक्षा दिली आहे.परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले.
अर्चना मासीरकर,
गटशिक्षणाधिकारी पं.स.पोंभूर्णा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने