Top News

‘कुलर’चा वापर जपून करा; अपघात टाळा! #Chandrapur


कुलर वापरत असाल तर ‘ही’ काळजी नक्की घ्या

एप्रिल महिन्याचा उत्तरार्ध सुरु होताच सूर्य अक्षरश: आग ओकत आहे, वाढत्या उष्म्याचा सामना करण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करत आहेत. उन्हाळ्यात घर, दुकाने, कार्यालये अशा सर्वच ठिकाणी कुलरचा वापर करतात. तापमानापासून बचाव करण्यासाठी याचा फायदा होत असला तरी, वापर करताना योग्य काळजी न घेतल्यास कुलर नुकसानदायकही ठरू शकतो. कुलरचा वापर करताना सुरक्षा उपाय महत्वाचे आहेत. योग्य काळजी घेतल्यास कुलच्या माध्यमातून शॉक लागण्याच्या घटना टाळता येऊ शकतात.
कुलरमध्ये कसा उतरतो ‘करंट’?

१) फेजवायर स्वीच म्हणून टाकल्यामुळे स्वीच ऑफ केला तरी लाईव्ह वायरचा परिणाम कुलरच्या बॉडीमध्ये येतो.

२) कुलरमध्ये पाणी असल्यामुळे इलेक्ट्रीकल सर्किट हा कुलरच्या लोखंडी बॉडीत येऊन आपल्या शरीराचा स्पर्श झाल्यास विजेचा धक्का बसतो.

३) स्वीचमधील लाईव्ह वायर, फेज, फेज वायरमधील तार कुलरच्या बॉडीला चुकून लागल्यास लिकेज करंट येऊन धक्का बसतो.

अशी घ्या काळजी

१) कुलरच्या टपमध्ये पाणी भरताना प्लग पिन काढून ठेवावा.

२) कुलरचे कनेक्शन व वायरिंग अधिकृत कारागिराकडून तपासून घ्यावे.

३) ओल्या हातांनी कुलरला कधीही स्पर्श करू नये.

४) कुलरमध्ये पाणी भरतांना टाकीच्या खाली घसरून ते पाणी बाजूला जमिनीवर फैलणार नाही याची काळजी घ्यावी.

५) लहान मुलांना कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे व कुलरच्या जवळ खेळणार नाही याची काळजी घ्यावी.

६) कुलर हलवताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी.

७) घरामध्ये रनिंग अर्थ वायरची जोडणी मीटर बोर्डवरील अर्थ बोल्टशी करण्यात यावी तसेच त्याची जोडणी स्वीचबोर्डमधील ३-पीन प्लग सॉकेटच्या अर्थ पॉईंटशी करण्यात यावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने