चंद्रपूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेंचा काँग्रेसला रामराम
चंद्रपूर:- पूर्व विदर्भात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर जिल्हा कॉग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये हुकुमशाही, परिवारवाद आणि दिशाहिन प्रदेश नेतृत्त्व असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
Also Read:- प्रकाश देवतळेंचा भाजपात प्रवेश
प्रकाश देवतळे म्हणाले, बहुसंख्य असलेल्या तेली समाजाला काँग्रेसने विदर्भात एकही उमेदवारी दिलेली नाही. तेली समाज काँग्रेसच्या पाठिशी राहिला आहे. पण त्याची प्रदेश अध्यक्षांनी दखल घेतली नाही. त्यामुळे नाराजीतून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देवतळे हे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. भाजपमध्ये प्रवेश घेणार का? हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.