राजकारण तसं सर्वसामान्य कुटुंबातील माणसाचं नसतं हि वाक्य नेहमी आपल्या कानावर पडत असतात. त्यामुळे त्या गावी कुणी फारसं भिरकत नाही. कुणी त्याच्या वाटेलाही जात नाही. पण हि वाक्य एका वाघीणीनं खोडून काढत "गाव टू ग्लोबल लिडरशिप" अशी राजकारणात आपली ओळख निर्माण केलेली आहे. हि व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून गोंडवाना म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोंभूर्णा तालुक्यातील भिमणी या छोट्याश्या गावची लढवय्यी वाघीण कु. अल्का श्रीनिवास आत्राम हि आहे. आदिवासी धर्म, आदिवासी संस्कृती या संस्कारात अल्का वाढलेली. तिची जळणघडण त्याच संस्कृतीला धरून झाली. पण म्हणतात ना की इतिहास घडविण्यासाठी इतिहास बनवावं लागतं ते अल्कानं प्रामाणिक प्रयत्न करून बनविलं. यात तिचा प्रामाणिकपणा, दृढ इच्छाशक्ती व कणखर नेतृत्व कारणीभूत ठरलं. तसं पाहिलं तर घरी अठरा विश्व दारिद्र्य. घरात शिक्षणाचं -अ- सुद्धा कुणाला माहीत नाही. आई वडिल दोघेही अशिक्षित. घरी तुटपुंजी शेती पण शेती करणार कोण. कारण अल्काचे वडील मजूर म्हणून बांबू भरण्यासाठी गेलेल्या ट्रकच्या अपघातात त्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. यात ते हाताने व पायाने अपंगच झाले. बरीच महिने ते खाटेवरच राहिले. कुठलाच पर्याय नसल्याने तुटपुंजी असलेली शेती दुसऱ्याला अरदबटाईन देऊन दिली. पण यातून काय मिळणार होतं. परस्थिती जैसे थेच. घरातले अडचणी पाहून वडिलांनी दुसऱ्याकडे माणूस (साल गडी) म्हणून काम करू लागले.
घरी अठरा विश्वे दारिद्र्य व मुला- बाळांचं शिक्षण हे प्रश्न डोळ्यासमोर होतेच. काही दिवसांनी तर हाता पायांनी पण असमर्थता दर्शवली आणि अल्काचे वडिल हे घरीच राहू लागले. पण हिंमत हरले नाही. घरी बसून जे काम करता येईल ते काम करू लागले. पण त्यांचेकडे काही दारू पिणारी लोकं यायची. घरी बळबळत राहायची. त्यामुळे असा प्रकार पाहून अल्काला या गोष्टीचा विट येऊ लागला. अवघ्या पाचवीत असताना तीने वडिलांकडे जाऊन अशी लोकं घरी येऊ देवू नका असं स्पष्ट बजावलं होतं. अगदी कमी वयात असतांनाच तिने केलेला हा पहिला बंड होता. अल्काचं वय लहान असलं तरी ती समजदार होती. ती आपल्या घरातली आर्थिक परिस्थिती रोज बघायची. तिचा संघर्ष तेव्हापासूनच सुरू झालं. घरात जे सुरू होतं ते नकोच पाहिजे म्हणून काही तरी मला करायचं आहे हि जिद्द तिच्या मनात सतत घोळत होती. तीला खाऊला मिळणारे पैसे गाडग्यात (ग्रामीण मुलांची घरगुती बॅक) जमा करून त्या पैस्याचं अल्काने शिक्षणात वापर करून घेतला. ती समजून घेतली होती की शिक्षणाशिवाय दुसरा काही पर्याय नाही.तीने शाळा कधी बुडविली नाही.अल्काची हि अशी साधी पण संघर्षाची कहाणी सुरू होती. यातच तिचं बि.ए. व ॲग्रीकल्चरचं शिक्षण पुर्ण झालं.
काॅलेज सुरू असतांनाच अल्काने स्पोर्ट फाॅर डेव्हलपमेंट या संस्थेत काम करणं सुरू केलं. यातूनच नेतृत्व व कौशल्य गुण डेव्हलप झालं. संस्थेत काम केल्याने आत्मविश्वास अधिक दृढ झाला होता. तिची लिडीरशीप क्वालिटी अधिक डेव्हलप झाली होती. सामाजिक सेवा करता यावी अशी ठाम भूमिका बाळगणारी अल्का गावाची सेवा करण्यासाठी सरपंच व्हायचंच स्वप्न पाहायला सुरुवात केली. भिमणीचे रहिवासी व तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. काळे यांना पाहून अल्काचा राजकारणाबद्दलचा आकर्षण अधिक दृढ झाला. आणि म्हणूनच म्हणतात ना की जिथे इच्छा प्रामाणिक असते तिथे संधी उपलब्ध होतेच. सन २०१२ मध्ये जिल्हा परिषद निवडणूकीसाठी अनुसूचित जमाती महिलेचा आरक्षण पडलं. अन् चिंतलधाबा-भिमणी क्षेत्रातून अल्काला भाजपाने संधी दिली. खरं तर सुधीर मुनगंटीवार यांनी पुर्णपणे विश्वास ठेवला. नवखी व राजकारणातला -र -माहित नसणारी अल्का जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडूनही आली. पाच वर्ष तिने अनेक योजना तालुक्यासाठी खेचून आणल्या. यादरम्यान तिने महिला संगठन मजबूत केला. २०१९ मध्ये पोंभूर्णा पंचायत समितीचे आरक्षण सर्वसाधारण महिला पडले. म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी अल्काला पंचायत समिती लढण्याची सुचना केली. यात अल्काने विजय मिळवला व सलग पाच वर्षे त्या सभापती पदावर विराजमान राहिल्या. अधिकारी, पदाधिकारी यांच्यासोबत समन्वय साधून काम केल्याची प्रचिती म्हणून तालुक्यात अनेकांना न्याय मिळाला. यादरम्यान अल्काने सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून मुलांचा प्रथम पाया असलेलं गुरूकुल म्हणजे अंगणवाडी याच्यासाठी निधी मंजूर केला. व बघता बघता तालुक्यातील अंगणवाडी आनंददायी अंगणवाडीत रुपांतर झालीत. एवढेच नव्हे तर यातील काही अंगणवाड्या आयएसओ नामांकन प्राप्त करू शकले. त्यांच्या कार्यकाळात पंचायत समितीलाही विविध पुरस्कार प्राप्त झाले. खरं पाहता अल्काने गावचं सरपंच बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते पुर्ण होऊ शकलं नाही पण तीने अनेक पदं भुषवली. आणि संधी मिळाली म्हणूनच भिमणी गावातली आदिवासीची वाघीण मध्यप्रदेश, आसाम राज्यात पक्षाचं काम करण्यासाठी गेली. हि तीची ग्लोबल आयडेंटिटीच तर होती.
अल्का म्हणजे वादळच. ती कुठल्याही स्टील फ्रेम मध्ये सटीक बसते. तसं तीचं कर्तव्यही तितकंच दमदार आहे. अल्काचं महिला संघटन फारच अफलातून आहे. कारण ती महिलांच्या भावनेशी समरस होते. महिलांच्या सुखदुःखात ती शामील होते. आणि म्हणूनच अनेक महिलांना अल्का मुलगी, बहिण, मैत्रीण वाटते. हि मिळकत पैसा व पुरस्कारापेक्षा कितीतरी मोठी पुंजीच तर आहे. नामदार सुधीर मुनगंटीवार यांचा अल्काला नेहमीच सहकार्य लाभला आहे. कारण सुधीर भाऊने टाकलेल्या विश्वासावर अल्का खरी उतरत होती. २०१७ मध्ये पक्ष संघटनेत काम करण्याची तीला संधी मिळाली. पहिल्याच वेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री पदी त्यांची वर्णी लागली. पक्ष संघटनेत दमदार संघटन कौशल्य, सर्वांना घेऊन चालण्याची नीती, मजबूत महिला संघटन करण्यात अल्का आत्राम यशस्वी राहिल्या. विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा हातखंडा होता.त्यामुळे त्या पक्ष संघटनेत आपली छाप सोडू शकल्या. ह्याच कामाची पावती म्हणून २०२० मध्ये अल्काला भाजपा महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली. अल्काने याही संधीचं सोनं केलं. जिल्हाभर फिरून महिलांचा संगठन तर मजबूत केलंच पण महिला कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात तयार केले. पक्षाने दिलेले काम अतीशय प्रामाणिकपणे व पोटतिडकीने करीत असल्याने त्यांची ओळख प्रमुख नेत्यांमध्ये केली जाऊ लागली. अल्काकडे अमोघ वक्तृत्वशैली, कणखर नेतृत्व, सहनशीलता, विनम्रता, एवढंच नव्हे तर पक्षाप्रती एकनिष्ठता याचाच परिपाक म्हणून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी २०२३ मध्ये अल्का आत्राम यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. ही चंद्रपूर जिल्हा भाजपा साठी गौरवन्वित करणारी गोष्ट होतीच पण एका गरीब आदिवासी समाजातील सर्वसामान्य मुलीला महाराष्ट्राच्या राजकारणात काम करण्याची संधी पार्टीने दिली. हिच मुळातून गौरान्वीत करणारी घटना होती. अल्काला पुर्व विदर्भाची जबाबदारी सोपविण्यात आली. अल्का हि जबाबदारी अतीशय समर्थपणे सांभाळत आहे.
अल्का आत्राम या सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निकटवर्ती आहेत. अल्कासाठी सुधीरभाऊ हे दैवतुल्यच आहेत. त्यामुळे नेहमीच सुधीरभाऊच्या मार्गदर्शनात तिला काम करण्याची संधी मिळाली. सुधीरभाऊची काम करण्याची कला, कौशल्य नीती, वेळेचं नियोजन, माणसं जोपासण्याचे तंत्र, समाजसेवेसाठी अहोरात्र कष्ट घेणे, ध्येयासाठी समर्पित राहणं हे जवळून बगता आले. या सर्व राजकीय प्रवासात सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा नेहमीच आशीर्वाद, मार्गदर्शन, सूचना व खंबीर साथ मिळाल्यानेच अल्का आपल्या राजकारणाचं, समाजसेवेचं व्रत पार पाडू शकत आहे. नामदार सुधीर मुनगंटीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांची अल्काला वेळोवेळी मदत मिळाली. प्रेरणा मिळत गेली. ती फक्त आणि फक्त अल्काच्या पक्षाप्रती एकनिष्ठता व समर्पित भावनेमुळेच. यात एक गोष्ट म्हणजे अल्काला खंबीर बनवण्यासाठी पोंभूर्णा नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष स्वर्गीय गजानन गोरंटीवार यांचीही मोलाची साथ मिळाली होती. त्यांनी अल्काला नेहमीच सहकार्य केलं. म्हणून अल्का कोणतीही परिस्थिती आली तरी कधी खचली नाही.
अल्का आत्राम यांना पशूपक्ष्यांबद्दल आपुलकी आहे. उन्हाळ्यात घराच्या गच्चीवर, झाडावर पक्ष्यांसाठी पाणीपात्र ठेवतात. हे काम त्या नित्यनेमाने करतात. वृक्ष लागवडीसाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. अल्काने कोरोना काळात फार मोलाची भूमिका बजावली. सर्वीकडे कोरोनाचे वातावरण असतांना तेलंगणा राज्यात पोटापाण्यासाठी गेलेल्या लोकांना स्वगावी अल्काने प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने अनेकांना सिधा सामुग्री देण्यात आली. अल्काचं यासाठी अग्रणी पुढाकार राहिला. अल्का निडर यासाठी आहे की, एवढ्या मोठ्या कोरोना सारख्या महामारीत ती बाहेर पडून लोकांसाठी कार्य करीत होती. तिच्या निडरपणाचे असे अनेक उदाहरणं पहायला मिळतील. गंगापूर व टोक या दोन गावात वैनगंगेला पुर आला की या दोन्ही गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी आणावे लागते. प्रशासनाच्या मदतीने अल्काने त्या लोकांचे रेस्कु केले आहे. नुकताच चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथील सहा महिला डोंगा उलटल्याने वाहून गेल्या हि माहिती अल्काला मिळताच ती डोंग्याने प्रवास करून घटनास्थळी पोहोचल्या त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वना केले.
तिचं हे स्पिरीट पाहिलं की तिच्या समाजसेवेच्या सामर्थ्याची ताकत समजते. एक गोष्ट म्हणजे घरच्या परिस्थितीमुळे जी शेती अरदबटाईने दुसऱ्याला दिली होती ती शेती मात्र अल्काने सोडविली. एवढंच नव्हे तर ती स्वतः शेती करीत आहे. आणि म्हणूनच शेतातलं चिखल करण्यासाठी ती स्वतः ट्रॅक्टरचं स्टेरींग घेऊन ट्रॅक्टर चालवते. ती राजकारणात व्यस्त असताना सुद्धा स्वतःच्या शेतीसाठीही वेळ देते. महिलांना रोजगार मिळावं, लघू उद्योग स्थापन व्हावी यासाठी अल्काने खुप प्रयत्न केले. त्यांना बऱ्यापैकी यशही आले आहे.
खरं तर अल्का ही अनेक महिलांची आयडॉल आहे. याला कारणही साजेसे म्हणजे ती महिलांच्या उन्नतीसाठी, रोजगारासाठी धडपडत असते. म्हणूनच चिमुकल्या वयात गावचं सरपंच व्हायचं स्वप्न पाहणारी अल्का आज राज्यात प्रदेश महामंत्री म्हणून काम करते. पक्षासाठी समर्पित काम करते. पक्षाच्या सुचना मिळताच विविध राज्यात पक्षाचं काम करायला जाते हि ग्लोबल लिडरशिपच तर आहे.
लेखक:- सुरज गोरंतवार, पोंभुर्णा