Top News

"दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा" हे कुठे आता माझ्यावर बंधन पडेल का ही भीती #chandrapur #chandrapurloksabha

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी जैवविविधता उद्यान उदघाटन, श्री. नाथीबाई ठाकरसी (एसएनडीटी) विद्यापीठ, मुंबई संचलित महर्षि कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाच्या भूमीपूजन, अमृत २.० अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकाच्या मलनि:स्सरण प्रकल्पाचे भूमिपूजन, अमृत २.० अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकाच्या पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पार पडले.


ना. सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

मुख्यमंत्री महोदय मी आपल्याला निमंत्रण देतोय निवडणूका संपू द्या. निवडणुकीमध्ये कितीही युद्ध झाले तरी मात्र एक गोष्ट नक्की आहे "जितेंगे तो मोदी ही!" संसद नवीन तयार झाली त्याच्या दरवाजाचे लाकूड आम्ही याच भूमीतून पाठवली आहे. फक्त असं होऊ नये मला त्याच दरवाजातून जायची आवश्यकता पडेल हि भीतीपोटी माझ्यावर भिती आहे. आणि मी राज्यगीत तुमच्या अनुमतीने निवड आणि त्यामध्ये शेवटचे शब्द आहेत "दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा" हे कुठे आता माझ्यावर बंधन पडेल का ही भीती मला वाटते आहे आणि म्हणून परवा मी तुम्हाला म्हटलं की या भीतीतून मला मुक्त करण्यासाठी तुम्ही तुमचं वजन वापरावा हे सुद्धा सांगितलं.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने