Top News

वणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ #chandrapur #chandrapurloksabha


चंद्रपूर हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा (संसदीय) मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पसरलेला आहे. चंद्रपूर हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या चंद्रपूर जिल्ह्यामधील 4 व यवतमाळ जिल्ह्यामधील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. वणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ 3 विधानसभा भाजपा, 2 विधानसभा कॉग्रेस तर 1 विधानसभेत अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

चंद्रपूर जिल्हा

राजुरा विधानसभा मतदारसंघ-70 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 अन्वये, केलेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार, राजुरा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील १. जिवती, २. कोरपना, ३. राजुरा आणि ४. गोंडपिपरी या तालुक्याच्या काही भागाचा समावेश होतो. राजुरा हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुभाष रामचंद्रराव धोटे हे राजुरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.


चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ-71 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, चंद्रपूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर तालुक्यातील घुगुस महसूल मंडळ आणि चंद्रपूर न. पा. या क्षेत्राचा समावेश होतो. चंद्रपूर हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती-SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

अपक्ष पक्षाचे उमेदवार किशोर गजानन जोरगेवार हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.


बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ-72 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, बल्लारपूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील १. मूल, २ पोंभूर्णा, ३. बल्लारपूर हे तालुके व ४. चंद्रपूर तालुक्यातील चंद्रपूर आणि चंद्रपूर रयतवारी या महसूल मंडळांचा समावेश होतो. बल्लारपूर हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार हे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

वरोरा विधानसभा मतदारसंघ-75 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, वरोरा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा आणि भद्रावती या तालुक्यांचा समावेश होतो. वरोरा हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिभा सुरेश धानोरकर हे वरोरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

यवतमाळ जिल्हा

वणी विधानसभा मतदारसंघ-76 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, वणी मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. मारेगांव, २. झरी जामणी आणि ३. वणी या तालुक्यांचा समावेश होतो. वणी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे संजिवरेड्डी बापुराव बोदकुरवार हे वणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आर्णी विधानसभा मतदारसंघ-80 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, आर्णी मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. आर्णी २. घाटंजी ही दोन तालुके आणि ३. केळापूर तालुक्यातील पाटणबोरी, पांढरकवडा ही महसूल मंडळे आणि पांढरकवडा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. आर्णी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती-ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

भारतीय जनता पक्षाचे संदिप प्रभाकर धुर्वे हे आर्णी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने