Top News

जि.प.उच्च प्रा.शाळा सुमठाणा व राजे शिवबा महिला ग्राम संघ सुमठाणा यांचे वतीने जागतिक महिला दिन साजरा.

जि.प.उच्च प्रा.शाळा सुमठाणा व राजे शिवबा महिला ग्राम संघ सुमठाणा यांचे वतीने जागतिक महिला दिन साजरा.


राजुरा:- जि.प.उच्च प्रा.शाळा सुमठाणा व राजे शिवबा महिला ग्राम संघ सुमठाणा यांचे वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रसंगी माजी महिला सरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा डाँ.ठाकूर मँडम यांनी कर्करोग व महिलांचे आरोग्य यावर मार्गदर्शन केले तसेच महिलांचे शुगर व बिपी तपासणी केली.
सौ.इंदिरा पहानपटे मँडम यांनी जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी व महत्त्व उत्तमरित्या सांगितले .
सोनाली कुबडे परसुटकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा यांनी स्वावलंबी होण्यासाठी व्यावसायिक शिक्षणाची गरज यावर सखोल मार्गदर्शन केले.
सौ.वैशाली भोयर यांनी मुलांच्या शिक्षणातील आईची जबाबदारी यावर महिलांशी संवाद साधला. अंबुजा फाउंडेशनच्या वतीने रजनी खानोरकर यांनी जल सँवर्धन बाबत मार्गदर्शन केले व महिलांसाठी प्रश्नमंजुषा घेऊन बक्षिस दिले.
  महिला दिनानिमित्य महिलांची कबड्डी एक मिनिट स्पर्धा , गायन स्पर्धा घेऊन बक्षिस देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन सौ.वैशाली भोयर व आभारप्रदर्शन रजनी खानोरकर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने