ना. मुनगंटीवार म्हणाले, "मला तिकीट कोणत्याही परिस्थितीत मिळू नये, यासाठी माझे पूर्ण प्रयत्न" #chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase

चंद्रपूर:- राज्यसभेतील खासदार आणि राज्यातील मंत्र्यांना, आगामी लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची भाजपाची रणनिती आहे. याचाच भाग म्हणून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यांना चंद्रपूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. काल ते सुद्धा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. राज्यात परतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल त्यांचे विचार जाणून घेतले.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“मला तिकीट कोणत्याही परिस्थितीत मिळू नये, यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो आहे. मात्र शेवटी यश-अपयश हे ईश्वराच्या हाती आहे. लोकसभेत जाण्याची माझी इच्छा नाही. पण पक्षाचा आदेश सर्वतोपरी असतो” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. “मला पक्षाने या राज्याची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. अयोध्येत श्रीरामाच्या मंदिरासाठी कास्ट पाठवण्याची संधी मला मिळाली. पाकिस्तान सीमेवर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची संधी मला मिळाली. वाघ नख घेऊन येण्याचा एमओयु करण्याची संधी मला मिळाली. चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये मला ज्याप्रमाणे विकास करण्याची संधी मिळाली. चंद्रपूरचा विकास करताना वेगवेगळी काम करता आली” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“माझी अजून तयारी झाली नाही. मी पक्षाकडे अजून हीच विनंती करतो आहे, मला इथेच राहू द्या असं मी म्हणतो आहे. पण पक्षाने आदेश दिला तर कार्यकर्ता म्हणून ते माझं कर्तव्य आहे” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.