चंद्रपुरात हत्या; धारदार शस्त्राने भोसकून तरुणाला संपविले #chandrapur #murder

Bhairav Diwase

चंद्रपूर:- गेल्या 2 महिन्यांपासून जिल्ह्यात सतत हत्येच्या घटना घडत असून चंद्रपुर जिल्ह्यातील हत्येच्या घटनेनं अख्य चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. अश्यातच चंद्रपूर रेल्वे स्थानक परिसरात काल रात्री 11 वाजताच्या सुमारास एका तरुणाने धारदार शस्त्राने वार करुन एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे.




सविस्तर वृत्त असे की, रात्री 11 ते 12 च्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या तिकीट घरासमोरील फलाट क्रमांक 1 कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाचा पोटात चाकूने वार करून खून करण्यात आला. वृत्त लिहेपर्यंत मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच आरोपीला अटक झालेली नाही. जीआरपीएफ पोलीस, रामनगर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून प्रकरणाचा तपास करत आहेत.