चंद्रपूर:- काल जन विकास सेनेचे संस्थापक व माजी नगर सेवक पप्पू देशमुख यांनी एका पत्र प्रसिध्दीतून कळविले होते की, नवीन भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन विसापूर येथे करण्यात येणार आहे. ते पुढे बोलले की, योजना चंद्रपूर शहराची आणि भूमिपूजन विसापुरात हा अजब प्रकार आहे.
शहरातील सर्व रस्ते खोदून 506 कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेसाठी पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन', असे स्पष्ट फलक लावून मनपा प्रशासनाने चंद्रपूर शहराच्या आत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याची हिम्मत दाखवावी असे आव्हान पप्पू देशमुख यांनी प्रशासनाला दिले होते.
या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री च्या चंद्रपूर आगमन निमित्त सुरक्षेच्या दृष्टीने रामनगर पोलीस यांनी आज सकाळी 11 वाजता पप्पू देशमुख यांना वरोरा नाका वरून ताब्यात घेऊन रामनगर पोलीस स्टेशन येथे ठेवले आहे.