दिल्लीला शिष्टमंडळ नेल्याने उमेदवारी मिळत नाही #chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase

आ. धानोरकरांनी शिवानी वडेट्टीवारांना लगावला अप्रत्यक्ष टोला
चंद्रपूर:- चंद्रपूर-वणी लोकसभा मतदार संघात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचा हा मतदार संघ होता आणि अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव हा मतदार संघ काँग्रेसने राखला. त्याच्यामुळे पक्षाने आदेश जरी दिला नसेल तरी या लोकसभेची दावेदार म्हणून मी माझी पूर्वतयारी चालू केली असल्याचे देखील प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.

दरम्यान, चंद्रपूरमधून उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षात शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात हेल्दी कॉम्पिटिशन असल्याची चर्चा रंगत दिसत आहे. याबत प्रतिभा धानोरकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, तिकीट मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, शिवानी वडेट्टीवार या काही माझ्या प्रतिस्पर्धी नाही. शिवाय कोणी दिल्लीला शिष्टमंडळ नेल्याने तिकीट मिळेल असे नाही. मात्र याबाबत आता पक्ष जो निर्णय देईल त्याचे मी पालन करणार असल्याचे देखील प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, चंद्रपूर लोकसभेवर कोणीही दावेदारी केला तरी पहिला हक्क माझा आहे. नुकतीच मी काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला याची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी माझे सगळं ऐकून घेतले आणि या संदर्भात मी सकारात्मक असल्याचे देखील त्यांनी मला सांगितले आहे. काँग्रेसमध्ये वेळेपर्यंत कुठला निर्णय होत नाही. अद्याप कुठलीही यादी जाहीर झाली नसल्याने याबाबत सध्या काही सांगता येणार नाही. मात्र काहीही झाले तरी मी काँग्रेसच्याच तिकिटावर लोकसभा लढवणार असल्याचा पुनरुच्चार देखील प्रतिभा धानोरकर यांनी बोलताना केला आहे.