Mahadev Jankar: परभणीतून महादेव जानकर लोकसभा लढणार #Parbhani #Mumbai

Bhairav Diwase
0

मुंबई:- राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) परभणीमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.



काय म्हणाले सुनील तटकरे?


"महायुतीच जागा वाटप वेळोवेळी चर्चा सुरू आहे. भाजपने २४ उमेदवार घोषित केले. शिंदे गटाने ८ जागांवर उमेदवार घोषित केले. रायगड आणि शिरूर जागांवर अजित पवार यांनी घोषणा केली आहे. आम्ही ७-८ जागा मागितल्या आहेत. सकारात्मक चर्चा सुरू आहे, असे सुनील तटकरे यावेळी म्हणाले.


तसेच "आम्ही परभणीची जागा मागितली होती. अमित शहा यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत ही जागा आम्हाला देण्याचं ठरलं आहे. महायुतीचे हित लक्षात घेता ही जागा महादेव जानकरांना (Mahadev Jankar) देण्याचे ठरले आहे," असे म्हणत सुनील तटकरे यांनी जानकरांच्या नावाची घोषणा केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)