Top News

दुरदृष्टी ज्ञानयोगी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचंड पाठपुराव्याचा फलश्रुती #chandrapur #chandrapurloksabha

विसापुरात साकारत असलेले एस.एन.डी.टी. महिला ज्ञानसंकुल!

चंद्रपूर:- एखादे शासकीय काम करतांना अनेकांना 'शासकीय काम बारा महीने थांब!' असा अनुभव आला असेलच. अपवाद वगळता शासकीय कामाला विलंब लागतोचं. तीच प्रथा मंत्रालयीन कामांची पण आहे. 'ईच्छा आहे, शोधले तर सुई सूद्धा मिळते, अन्यथा मंत्रालय व प्रशासकीय कामात हत्ती ही सापडत नाही.' असे म्हटल्या जाते. एखादा लोकप्रतिनिधी आहे म्हणून त्याचे काम त्वरित होईल असे जर सर्वसामान्यांना वाटत असेल तर तो त्यांच्या 'भ्रम' आहे. हे मंत्रालयात व प्रशासकीय कार्यालयात जाणाऱ्यांना वेगळे सांगावे लागत नाही. सरकारी काम करायचे असेल तर अर्जुनाने आपल्या तिराने द्रौपदी स्वयंवरादरम्यान जसे मासोळीच्या डोळ्याला लक्ष करून माशाच्या (मासोळी) डोळ्याचा निशाना साधला होता, त्याचप्रमाणे विकासकामे मंत्रालयातून कामे खेचून आणणे हा सुधीरभाऊ यांचा बाणा - स्वभाव आहे. 

शतकापूर्वी शिक्षण महर्षी महषी धोंडो कर्वे यांनी देशातील पहिले महिला विद्यालय श्रीमती नाथीबाई दामोधर ठाकरसी महिला (एस.एन.डी.टी.) विद्यालयाची स्थापना केली, हा मोठा प्रकल्प आपल्या जिल्ह्यात कसा येईल, याचे स्वप्न बघितले आणि आज ते सत्यात उतरले आहे. बंगलोरच्या धरतीवर वनसंपत्ती असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात बोटॅनिकल गार्डन ची स्थापना कशी होईल हे स्वप्न वास्तव ही आज बघायला मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठाची स्थापना, नागपूर विद्यापिठाचा नामविस्तारासारखे मोठे प्रकल्प अर्जुनाने माशाचा डोळावर तिर केंद्रित करून निशाना साधला व स्वयंवर जिंकले त्याप्रमाणे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचंड पाठपुरावा करून मंत्रालयातून विकास कामे - प्रकल्प खेचून आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही. विकास कामे खेचून आणणे हा मुनगंटीवार यांच्या स्वभावाच्या एक भाग व दुसरी बाजू जाते. एखादे काम हाती घेतले की ते पुर्णत्वास न्यायचेचं याचमुळे त्यांनी ज कामाला हात लावले ते प्रत्यक्षात उतरल्याशिवाय राहत नाही.

महाराष्ट्रामध्ये महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वेयांनी १९१६ साली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची या देशातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. विद्यापीठाची शतकोत्तर वाटचाल सुरू असुन सन २०२२ मध्ये विद्यापीठाने १०६ वर्ष पुर्ण केली आहेत. शिक्षणाद्वारे महिलांचे सबलीकरण करण्याचे उद्दिष्ट लक्षात घेता विद्यापीठाने शासनाच्या योजनेनुसार ग्रामीण, आदिवासी भागात उच्च शिक्षण नोंदणी दर कमी असलेल्या महिलांना कौशल्य विकास संदर्भातील अभ्यासक्रम सुरू करून तेथील स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने विसापूर येथे हे ज्ञानसंकुल उभारण्यात येणार आहे. 

महिलांनी शिक्षणाच्या क्षेत्रात आपली पाऊले मोठ्या प्रमाणात रोवली आहे. आज अनेक मोठ-मोठ्या पदावर महिला कार्यरत आहेत. मुलींनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन आपला ठसा उमटावा या उद्देशाने ज्ञानयोगी, अभ्यासु सांस्कृतिक, वनेमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अथक परिश्रमाने भारतातील पहिले महिला विद्यापीठ एस.एन.डी.टी. (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ) चंद्रपूर जिल्ह्यातील विसापुर येथे विसापूर येथे या ज्ञानसंकुलाचे उपकेंद्राची सुरूवात करण्यात आली आहे. आता या ज्ञानसंकुलाच्या वास्तुचे भुमिपूजन झाले असुन बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे या विद्यालयासाठी ५० एकर जागा उपलब्ध असुन ८७२९०.०० चौ. मी. जागेमध्ये साकारणार आहे. विंग ए, विंग बी, विंग सी मध्ये शैक्षणिक इमारत प्रशासकीय कार्यालये, १५० क्षमता असलेले सेमिनार हॉल (जी+१), वर्ग खोली, व्याख्यान सभागृह ३०० आसन क्षमता असलेले सभागृह, बोर्ड मिटींग रूम, फॅकल्टी रूम, तर जी + १ मध्ये एका खोलीत ५ विद्यार्थीनी, बाल्कनी व संलग्न शौचालय ब्लॉकसह ७०० विद्यार्थीनी क्षमता असलेले दोन निवासी वसतीगृहाच्या इमारतीच्या निर्मीती होणार आहे. जी + १ मध्ये १५० विद्यार्थीनी वाचन क्षमता असलेली डिजिटल लायब्ररी सोबत प्रशस्त ग्रंथालयाची इमारत तर ८६० विद्यार्थीनीची क्षमता असलेले सभागृह, २०० ची क्षमता असलेले कॅफेटेरिया, ६०० विद्यार्थीनीची क्षमता असलेली भोजनगृहाची इमारत, सोबतचं क्रिडा सुविधेसाठी इनडोअर स्पोर्टस् इमारत साकारणार असुन त्यात बॅडमिंटन, टेनिस, बास्केट बॉल, लगोरी, लंगडी, आट्या-पाट्या, खो-खो इत्यादी सारखे विविध पारंपारिक खेळाची सुविधा या इमारतीत राहणार आहे. व्यायामशाळा, कराटे, बॉक्सिंग, कुस्तीसाठी खास हॉल ची निर्मीती अति विशीष लाऊंजसह ८०० व्यक्तींची क्षमता असलेली दर्शक गॅलरी, अतिथीगृह इमारत, सेंट्रल एक्झिबिशन हॉल, शिक्षक कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सामान्य कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था याठिकाणी राहणार आहे. इमारतीमधील तापमान नियंत्रित रहावी याकरीता कॅव्हीटी सह बाह्य भिंतीची तरतूद करण्यात आली आहे. इमारतीच्या दर्शनी भागात एलिव्हेशन करीता १०० एमएम जाडी वायर ब्रिक क्लॅडिंग चा वापर करण्यात येणार आहे आणि ते उष्णता वाढ कमी करण्यास देखील मदत करते. दिर्घ कालावधी ची गरज लक्षात घेता ज्ञानसंकुलामध्ये मेटल दरवाजे व युपिव्हीसी खिडक्या या ठिकाणी लावण्यात येणार आहे.

या ज्ञानसंकुलाला आकर्षक, प्रशस्त व देखणे व्हावे यासाठी फुटपाथ, सीट आऊटस्, प्लाझा, स्ट्रीट फर्निचर, ओपन एअर ऍफिथिएटर, वॉटर बॉडीज, हार्ड स्केप, लँडस्केप, वॉटर ट्रिटमेंट प्लांट इत्यादी सोयी- सुविधासह या विद्यापीठाचे सा.बां. विभागाचे अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली हैद्राबाद ची के. एम. व्ही. प्रोजेक्टस, लिमिटेड या कंत्राटदारांकडून या बांधकाम होणार असुन १८ महिन्याच्या कालावधीत या वास्तुची निर्मीती प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. एस.एन.डी.टी. चे हे उपकेंद्र बल्लारपूर येथील डिजिटल स्कूल या इमारतीमध्ये काही विशिष्ट अभ्यासक्रमासह २०२३ - २४ चे शैक्षणिक सत्र सुरू करण्यात आले असुन भविष्यात अंदाजे ६२ प्रकारचे विविध अभ्यासक्रम या ज्ञानसंकुलात सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नुकतेच भुपूजपुजन झाले असुन तिव्र वेगाने या ज्ञानसंकुलाचे कार्य पुर्णत्वास येईल. ही सुधीरभाऊंच्या कार्यकर्तुत्वाची फलश्रुती आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने