चंद्रपूरची निवडणूक विकास आणि प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची:- बीआएस अध्यक्ष वमशिक्रिष्णा
चंद्रपूर:- भारत राष्ट्रीय पार्टीने (बीआरएस) आज भारतीय जनता पार्टी-शिवसेना राष्ट्रवादी-रिपाई महायुतीचे चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा घोषित केला असून त्यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे. बिआरएस चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष वमशिक्रिष्णा अरकिल्ला यासंदर्भातील समर्थनपत्र श्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे. तेलंगनाचे माजी मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव हे बिआरएस चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
ही निवडणूक चंद्रपूर जिल्ह्याच्या आणि लोकसभा मतदारसंघाच्या विकास आणि प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, समाजातील गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि बेरोजगारांच्या कल्याणासाठी काम करणारा लोकप्रतिनिधी संसदेत जावा ही बीआरएसची भूमिका असून, सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा लेखाजोखा बघितल्यास चंद्रपूरच्या विकासाकरिता दुसरा पर्याय नाही अशी पक्षाची भूमिका असल्याने हे समर्थन जाहीर करण्यात आल्याचे बी आर एस चे जिल्हा अध्यक्ष श्री. वमशिक्रिष्णा अरकिल्ला यांनी म्हटले आहे. बीआरएस चे पदाधिकारी, भाजपा तेलगू आघाडीचे अध्यक्ष श्री. शेखर रेड्डी यांच्या उपस्थितीत जिल्यातील बिआएरस च्या प्रमुख नेत्यांनी रविवारी श्री सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर येथे भेट घेऊन समर्थन पत्र दिले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ श्री सुधीर मुनगंटीवार थेट जनतेत जात असताना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध संस्था संघटनांचे समर्थन, भारतीय जनता पार्टीच्या विजयाची खात्री पटवून देणारा असून बीआरएस च्या समर्थनामुळे त्यात भर पडली आहे.
या समर्थनाबद्दल श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बीआरएस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून, त्याच्या जीवनातील अंध:कार दूर करण्यासाठी, चंद्रपूर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अधिक गतीने काम करण्यासाठी पंतप्रधान विश्व गौरव नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. बीआरएसचा विश्वास सार्थ ठरवून विकासाच्या मार्गाने चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा यापुढे बुलेट ट्रेन च्या वेगाने धावेल असे आश्वासन दिले. बीआरएस पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन प्रचाराची दिशा ठराविण्यात येईल असे श्री श्री. वमशिक्रिष्णा यांनी सांगितले.
#NarendraModi #PMNarendraModi #SudhirMungantiwar #pratibhadhanorkar #VijayWadettiwar #ShivaniWadettiwar #Subhashdhote #SudhirMungantiwarvspratibhadhanorkar #chandrapurloksabha #chandrapurloksabha2024 #BJPvsNCP #ajitpawar #sharadpawar #ncp #eknathshinde #monsoon2024 #kishorjorgewar #shindefadnavisgovernment #devendrafadnavis #jitendraawhad #prafulpatel #chhaganbhujbal #maharashtrapolitics #Adharnewsnetwork #marathinewslive #marathinewsadharnewsnetwork #maharashtranewsadharnewsnetwork #marathibatmyanewsAdharnewsnetwork #live #ChhatrapatiSambhajinagar #MahavikasAghadiSabha #ThackerayGroup #Congress #NCP #BJP #chandrapur #gadchiroli #Nagpur #Maharashtra #Vidharbh #bhairavdiwase #murder #SupremeCourtHearing #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #vidhansabha #EknathShinde #SanjayRaut #ShindeVSThackeray #SupremeCourtResult #EknathShinde #maharashtrapolitics #rainupdate