Top News

जि. प. शाळेच्या तथाकथित अध्यक्षाची दादागिरी #chandrapur #ballarpur

बातमीदाराला मज्जाव करण्याचे प्रकरण भोवले
विसापूर:- बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठे गाव आहे. गावात चार माध्यमिक व चार जि.प.च्या शाळा आहेत.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पार पडलेल्या कार्यक्रमांचे वृत्त संकलन करण्यासाठी एका अग्रणी वृत्तपत्राचे वार्ताहर जि.प.प्राथमिक शाळेत वृतांकनासाठी गेले.त्यावेळी जि. प.प्राथमिक शाळेच्या तथाकथित अध्यक्षांनी मज्जाव करून दादागिरीचे प्रदर्शन केले.या प्रकरणाची बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी अमोल शंकर खनके व त्याचा साथीदार यांचेवर भा द वि च्या कलम २९४,३२३,५०६ व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ३(१) आर, ३(१) एस.अन्व्ये गुन्हा दाखल केला आहे.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील एका अग्रणी दैनिक वर्तमान पत्राचे फिर्यादी बातमीदार म्हणून काम करतात. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम पार पडला.याचं दिवशी शाळेचा निकाल देखील जाहीर करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक धनराज दुर्गे यांनी सदर वार्ताहराला सन्मानाने बसविले. ही बाब तथाकथित जि. प.प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल खनके व प्रीतम पाटणकर यांनी फिर्यादीसोबत हुज्जत घालून मज्जाव केला. येथेच आरोपी व त्याचा साथीदार थांबला नाही.तर फिर्यादीसोबत भांडण करून हातापाई केली. दादागिरीने चौथळून वारंवार अंगावर धावून येत, तुला जीवनिशी मारून टाकतो म्हणून बोलत होता. येथेच ते थांबले नाही.त्यांनी फिर्यादीच्या जातीवरून शिवीगाळ देखील करून फिर्यादीचा उद्धार केला. याप्रकरणी फिर्यादीने बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने फिर्यादीचे कुटुंब दहशतीत आले, असून मानसिक दडपणात आले आहे.

अमोल खनके यांचा पाल्य चालू शैक्षणिक सत्रात नाही. मागील वर्षी त्याचा पाल्य शाळेत असल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे ते अध्यक्ष होते.नियमानुसार ते आजघडीला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाही.परंतु ते नेहमी शाळेत येत होते.महाराष्ट्र दिनी घडलेला प्रकार दुर्दैवी होता.माझे समक्ष त्या वार्ताहरावर त्यांनी हात उगारून भांडण केले.आम्हाला गावातील प्रत्येकांचे सहकार्य अपेक्षित आहे.त्या दृष्टीने आम्ही सार्वजनिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून विध्यार्थ्यांना घडवितो.
धनराज दुर्गे,मुख्याध्यपक जि.प.प्राथमिक शाळा, वस्ती विभाग विसापूर.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने